Join us

'दुग्धाभिषेक' - दुध आंदोलनाची व्हायरल छायाचित्रे...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 4:20 PM

1 / 10
राज्यभरात दूध आंदोलन चांगलेच पेटले आहे. खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वात हे शेतकरी या आंदोलनात सहभागी होत आहेत.
2 / 10
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या पुकारलेल्या आंदोलनात मंगळवारी दुसऱ्या दिवशीही कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतक-यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तर दुध पिशव्याही रस्त्यावर फेकून देण्यात आल्या आहेत.
3 / 10
दुध आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्यानी कुठे रस्त्यावर दुध फेकून तर कुठे मंदिरात देवाला दुग्धाभिषेक करुन सरकारचा निषेध नोंदवला.
4 / 10
गायीचे दुधही आईच्या दुधाइतकेच पवित्र मानून अनेक आंदोलकांनी दुध रस्त्यावर फेकून देण्याऐवजी शाळेतील मुलांना मोफत वाटून सरकारचा निषेध नोंदवला.
5 / 10
गावाकडील तरुण मित्रांनाही या दुध आंदोलनात सहभाग घेतला. पण, दुधाची किंमत जाणून घेऊन दुध रस्त्यावर न फेकता गावातीलच गरजूंना वाटप केलं.
6 / 10
आंदोलनात सहभागी झालेल्या अनेकांनी सरकारविरुद्ध रोष व्यक्त करत चक्क रस्त्यावरच दुध फेकून दिले.
7 / 10
आंदोलनातील काही तरुण कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळावर दुग्धाभिषेक करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
8 / 10
गावाकडील तरुणांनी डेअरीला घालण्यात येणार दुध अडवून चक्क रस्त्यावर दुध फेकत सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवला.
9 / 10
गरुजुंना दुधवापट करुनही काही आंदोलकांनी शांतबद्ध पद्धतीने निषेध नोंदवला. सरकारने लिटरमागे 5 रुपये दर वाढवून द्यावा, यासाठी खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वात हे आंदोलन पुकारले आहे.
10 / 10
धरणीमातेला जणू दुग्धाभिषेक घालतात की काय हे आंदोलनकर्ते, असेच या छायाचित्रातून दिसत आहे. गेल्या 2 दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाची धार आज अधिकच तीव्र पाहायला मिळाली.
टॅग्स :milkदूधMilk Supplyदूध पुरवठाRaju Shettyराजू शेट्टीagitationआंदोलन