Join us

डेक्कन क्वीन नव्या रंगात, नव्या ढंगात! गाडीला लवकरच लागणार अत्याधुनिक डबे; पाहा, PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 2:59 PM

1 / 9
भारतीय रेल्वेला खूप मोठा इतिहास आहे. आताच्या घडीला भारतीय रेल्वेच्या सेवेत असलेल्या अनेक गाड्या अशात आहेत, ज्यांनी शतकी सेवा दिली आहे. यापैकी एक आघाडीचे आणि सर्वाधिक लोकप्रिय नाव म्हणजे देशातील पहिली डिल्स ट्रेन Deccan Queen.
2 / 9
तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण मुंबई-पुणे या मार्गावर Deccan Queen या गाडीची सेवा ०१ जून १९३० सालापासून सुरू आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय रेल्वे गाड्यांमध्ये डेक्कन क्वीनचा नंबर वरचा लागतो.
3 / 9
मात्र, भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. Deccan Queen ला आता अत्याधुनिक LHB कोच जोडले जाणार आहेत. इतकेच नव्हे, तर या गाडीचा रंग देखील बदलण्यात आले आहे.
4 / 9
Deccan Queen ला लावण्यात येणारे अत्याधुनिक LHB डबे चेन्नईच्या कारशेडमध्ये तयार असून, लवकरच डेक्कन क्वीन प्रवाशांना नव्या अवतारात पाहायला मिळेल, असे सांगितले जात आहे.
5 / 9
Deccan Queen लागणाऱ्या या एलएचबीच्या नवीन कोचमध्ये उत्तम सुरक्षा बरोबर अनेक वैशिष्ट्ये आहेत, प्रवासात एक वेगळा अनुभव आता घेता येणार आहे. डेक्कन क्वीनच्या डब्यांत उत्तम सस्पेंशन सिस्टीम आणि उत्तम सवारी आराम करण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
6 / 9
Deccan Queen च्या नवीन अवताराचा फायदा मुंबई-पुणे मार्गावर कामासाठी अप-डाऊन करणाऱ्या शेकडो लोकांना होणार आहे.
7 / 9
आता Deccan Queen गाडीच्या नवीन रेकमध्ये एकूण २० डबे असतील. शिवाय, डेक्कन क्वीनमधील डायनिंग कारची आसन क्षमता ४० डिनर टेबल असणार आहे, असे सांगितले जात आहे.
8 / 9
दरम्यान, डेक्कम क्वीन ही पहिली डिलक्स ट्रेन होती. मध्य रेल्वेने मुंबई-पुणे डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्सप्रेस या विशेष ट्रेनला एक व्हिस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेतला होता.
9 / 9
पुणे-मुंबई मार्गावरील गाडीला हा दुसरा व्हिस्टाडोम कोच आहे. या मार्गावर पहिल्यांदा मुंबई डेक्कन एक्सप्रेसला विस्टाडोम कोच जोडण्यात आला होता.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेMumbaiमुंबईPuneपुणे