Deputy Chief Minister Ajit Pawar has appreciated the work of Rupali Patil
रुपाली पाटील यांच्या कामाचं अजित पवारांकडून कौतुक; एक किस्सा सांगितला अन् संकेतही दिले! By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 7:28 PM1 / 5 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पुण्यातील महिला आघाडीच्या डॅशिंग नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombare Joining NCP) यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. रुपाली पाटील-ठोंबरे यांच्या पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुण्यात पक्षाच्या महिला आघाडीला बळ मिळालं असल्याचं म्हणत कौतुक केलं आहे.2 / 5रुपाली पाटील या धडाकेबाज आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे आणि त्यामुळेच त्यांची वेगळी ओळख आहे. त्यांचा आमच्या पक्षाला १०० टक्के फायदा होईल यात शंका नाही. पुणे भागात त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांचं नाव लौकिक आहे, असं अजित पवार म्हणाले. तसेच रुपालीताईंना मला सांगायचंय, तुम्ही कोणत्याही प्रकारची भावना मनामध्ये आणू नका. निश्चितपणे तुमच्यासारख्या भगिनींना पुणे महापालिकेत संधी मिळाली पाहिजे, असं म्हणत महापालिकेच्या निवडणूकीत उमेदवारी देण्याचे संकेतही अजित पवारांनी दिले आहे.3 / 5शहरवासियांचे प्रश्न सोडविण्याकरिता, वॉर्डाचे-प्रभागाचे प्रश्न सोडविण्याकरिता, अधिकारी वर्गावर अंकुश ठेवण्याकरिता, चुकीची कामं करणाऱ्यांवर दरारा निर्माण करिण्याकरिता, तुमचा उपयोग, तुमचं काम निश्चितपणे राष्ट्रवादीला मदतीचं ठरेल, हा विश्वास वाटतो', असं अजित पवार यावेळी रुपाली पाटील यांना म्हणाले. 4 / 5अजित पवार यांनी रुपाली पाटील यांचा एक किस्सा देखील सांगितला. रुपालीताई एवढ्या आक्रमकपणे काम करतात, मला आठवतंय, एक निवडणूक अशी होती, की त्या निवडणुकीचा त्या प्रचार करत होत्या, त्यावेळी त्या गरोदर होत्या. त्या प्रचारातच त्यांची डिलिव्हरी झाली. लोकांच्या प्रश्नांवर रुपालीताईंचं काम खरंच खूप चांगलं आहे, असं अजित पवार म्हणाले. 5 / 5दरम्यान, रूपाली पाटील या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. तसेच मनसेच्या महिला विभागाच्या पुणे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली होती. अलीकडेच त्यांची शहराध्यक्ष पदावरुन उचलबांगडी करत राज्य उपाध्यक्ष पद दिले होते. मंगळवारी त्यांनी आपला राजीनामा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सादर केला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications