Join us

Ganesh Visarjan 2018: पुढच्या वर्षी लवकर या, 'राजा'ला भक्तिमय निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 2:48 PM

1 / 7
मुंबईतील गिरगावच्या चौपाटीवर आज लाडक्या लालबागच्या राजाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला.
2 / 7
लालबागच्या राजासह अश्वारुढ मुंबईच्या राजाचेही गिरगाव चौपाटीवर मोठ्या गर्दीत अन् पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात विसर्जन करण्यात आले
3 / 7
वरळीच्या राजालाही वरळी सी लिंक येथील समुद्रात भाव अन् भक्तिपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला
4 / 7
मुंबईतील गिरगावच्या चौपाटीवर लालबागच्या राजासह मुंबईतील इतरही मंडळातील राजांचे विसर्जन करण्यात आले, यावेळी भक्तांनी रात्रीपासूनच गर्दी केली होती.
5 / 7
लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मच्छिमारही आपल्या नावा घेऊन गिरगावच्या समुद्रात तैनात होते, 10 दिवसाच्या उत्सवानंतर आज वातावरण भावून बनलं होतं
6 / 7
बाप्पांच्या विसर्जनाचा सोहळा, याची देही याची डोळा साठवावा असाच होता. त्यामुळेच माध्यमांचे कॅमेरेही या समुद्रतटावर गर्दी करुन होते
7 / 7
सर्वांच्या मनी होती एकच आस, पुढच्या वर्षी लवकर या...
टॅग्स :Lalbaugcha Rajaलालबागचा राजाGanpati Festivalगणेशोत्सवGanesh Visarjanगणेश विसर्जन