Join us

मुंबईत ईडी'राज', चर्चा तर होणारच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 2:54 PM

1 / 10
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आज चौकशीसाठी ईडीच्या अधिकाऱ्यासमोर हजर राहावे लागणा होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसे नेत्यांची धरपकड केली
2 / 10
मुंबईतील फोर्ट परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे, जेथे ईडीचं कार्यालय आहे.
3 / 10
मुंबईतील ईडीचं हेच ते कार्यालय जिथं राज यांची ईडीमार्फत चौकशी होतेय.
4 / 10
मनसे कार्यकर्त्यांकडून अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबईतील अनेक ठिकाणावर असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
5 / 10
राज ठाकरे ईडी कार्यालयाजवळ पोहोचताच माध्यमांनी आवाज देत राज यांचं लक्ष वेधलं
6 / 10
राज हे आपल्या कुटुंबासमवेत ईडी कार्यलायाकडे आले, पण त्यांच्या कुटुंबींयास ईडीच्या कार्यालयात जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे ते एकटेच गेले
7 / 10
राज ठाकरे ईडी कार्यालयात गेल्यानंतरही कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा होता.
8 / 10
मुंबईच्या फोर्ट परिसरात पोलिसांसह सैन्य दलातील तुकड्यांना पाचारण करण्यात आले होते.
9 / 10
चौकशीला ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी राज यांनी माध्यमांना हात उंचावून अभिवादन केलं
10 / 10
राज ठाकरेंच्या देहबोलीत अनेकांना बाळासाहेबांचा आभास होतो. तोच दरारा, तीच दहशत असे मेसेजही सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMumbaiमुंबईEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय