By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 16:18 IST
1 / 5नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून सुवर्ण बाजारात मोठा उत्साह आहे. सोने-चांदी खरेदी वाढली असून, दोन दिवसांत तर अधिकच ग्राहक सोने व चांदीकडे वळत आहेत, असे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. विजयादशमीच्या पूर्वीच अस्सल सोन्याची एक प्रकारे लयलूट सुरू असून हा उत्साह दिवाळीपर्यंत कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे.2 / 5दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर अनेकांनी आज सोनं खरेदीला प्राधान्य दिलं आहे. पुण्यात आज 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रँमचा दर हा 46,100 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रँमचा दर हा 49,360 रुपये इतका आहे. मुंबईचा विचार करता 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रँमचा दर हा 46,980 रुपये इतका असून 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रँमचा दर हा 47,980 इतका आहे. 3 / 5 चांदीच्या दरात मागील आठवड्यात स्थिरता होती. दिवाळीच्या तोंडावर त्यामध्ये प्रति तोळा ३०० रूपयांची वाढ झाली, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने वाहतूक खर्चातही वाढ झाली. याचा परिणाम जिल्ह्यातील सराफा बाजारावर झाला आहे. दिवाळीत हा दर पुन्हा वाढू शकतो.4 / 5विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. 5 / 5लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला 4.9375 ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.