Join us

Eknath Shinde: हिंगोलीतही शिवसेनेचे दोन गट, उद्धव ठाकरेंच्या भेटीलाही भगवं वादळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 9:05 PM

1 / 8
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी ऐनवेळी शिंदे गटात सामील होत उद्धव ठाकरेंना धक्का दिला होता. याप्रकरणी पक्षाकडून त्यांची जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली.
2 / 8
बांगर यांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला विरोध करत आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आमदार संतोष बांगर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.
3 / 8
संतोष बांगर यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले होते. यावेळी भर पावसात बांगर यांनी समर्थकांना संबोधित केलं. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संतोष बांगर यांच्या समर्थकांची दखल घेतली.
4 / 8
आमदार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना कोरोना काळात स्वतःच्या बँकेतील ठेवी मोडून मतदारसंघातील नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी धावून जाणारा असा हा आमदार असल्याचे म्हटले.
5 / 8
संतोष बांगरला त्याच्या पदावरून दूर करणे कुणालाही शक्य नाही, असेही एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
6 / 8
तसेच भविष्यात देखील जनसामान्यांची सेवा त्यांच्या हातून अशीच घडावी अशी अपेक्षा यासमयी व्यक्त केली. यापुढे एकाही शिवसैनिकावर अन्याय होऊ देणार नाही असेही, याप्रसंगी बोलताना त्यांनी ठामपणे सांगितले.
7 / 8
दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातील सहापैकी पाच तालुकाप्रमुख आणि सर्व उपजिल्हाप्रमुख, तसंच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व माजी नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याची माहिती आहे.
8 / 8
हिंगोलीतील संतोष बांगर यांच्यासोबत नसलेल्या इतर शिवसेना नेत्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवन येथे भेट घेतली. यावेळी, उद्धव ठाकरेंनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.
टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेHingoliहिंगोली