Join us

शेतकऱ्यांची दिवाळी ! बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 4:14 PM

1 / 6
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीस बुधवारपासून ( 18 ऑक्टोबर )सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात 10 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार
2 / 6
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकात पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात शेतक-यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊन प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांचा केला गेला सन्मान
3 / 6
दिवाळीनंतर महिनाभरात सर्वच पात्र शेतक-यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
4 / 6
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफी करण्यात आली
5 / 6
निवडक शेतक-यांचा मुख्यमंत्र्यांच्या सहीचे प्रमाणपत्र, साडी-चोळी देऊन सपत्नीक सत्कार
6 / 6
निकषांमध्ये बसणारा शेवटचा शेतकरी जोपर्यंत कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही, अशी ग्वाहीदेखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली
टॅग्स :FarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार