मुंबई : लोअर परळमध्ये पुन्हा अग्नितांडव ! नवरंग स्टुडिओ जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 15:51 IST
1 / 5लोअर परळ येथील तोडी मिलमध्ये असलेल्या नवरंग स्टुडिओला (19 जानेवारी) मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. 2 / 5या अग्नितांडवात स्टुडिओचा चौथा मजला जळून खाक झाला आहे. 3 / 5हा स्टुडिओ अनेक वर्षापासून बंद असल्याने सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 4 / 5मात्र आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे. 5 / 5आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या