Sanjay Raut: राऊतांच्या गळ्यातील गमछावर 'मशाल', हाती पुष्पहार; तुरुंगाबाहेरचे फोटोsss
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 19:51 IST
1 / 8मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसानंतर राऊत यांना जामीन मंजूर झाला. 2 / 8राऊतांना जामीन मिळाल्याने ठाकरे गटाच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे. तर ऑर्थर रोड कारागृहाबाहेर शिवसैनिकांनी दिवाळी साजरी केली. याठिकाणी राऊतांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती. कोण आला रे कोण आला... शिवसेनेचा वाघ आला... अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 3 / 8गळ्यात भगवा गमछा परिधान करुन ऑर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातून संजय राऊतांची बाहेर एंट्री झाली. यावेळी, शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला होता. शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर आणि अनिल राऊत हे संजय राऊत यांना भेटण्यासाठी ऑर्थर रोड कारागृहात दाखल झाले होते. 4 / 8संजय राऊत यांनी तुरुंगातून बाहेर येताच गाडीत बसल्यानंतर उपस्थित शिवसैनिकांनी हात जोडून नमस्कार केला. त्यानंतर, गाडीच्या सनरूफमधून बाहेर येत हात उंचावून राऊत यांनी शिवसैनिकांना अभिवादन केले. 5 / 8काही शिवसैनिकांनी मोठा पुष्पहा घेऊन संजय राऊत यांचे स्वागत केले. त्यावेळी, हाती पुष्पहार घेऊन आणि गळ्यात भगवा गमछा, त्यावर मशाल होती. राऊतांनी शिवसैनिकांना हात दाखवून अभिनंदन केले. 6 / 8मोठ्या गर्दीतून त्यांची कार बाहेर जात होती. राऊत हे तुरुंगातून थेट सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी जात आहेत, त्यानंतर, शिवतिर्थवर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर, ते मातोश्रीवर जाणार असल्याचे समजते. 7 / 8आम्ही लढणारे आहोत, लढत राहू. बाहेर आलोय, बघू आता पुढे काय होतंय. अटक बेकायदेशीर होती, असं न्यायालयाने सांगितलं. न्यायालय म्हणतंय म्हणजे खरचं असेल. 8 / 8कार्यकर्त्यांनी कार्यक्रम ठरवलंय, तिकडे जाईल. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणारच, असे म्हणत राऊत यांनी शिवतिर्थवर जाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर, ते मातोश्रीवर जाणार आहेत.