'राज ठाकरेंनी मोदींवरील टीकेवर उत्तर द्यावे'; भाजपा-मनसे युतीविरोधात माजी खासदाराने ठोकला शड्डू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 14:25 IST
1 / 6मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा- शिंदे सेना व मनसे अशी युती होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच राज ठाकरे यांनी केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्याची भूमिका शिंदे, फडणवीस यांनी घेतल्याचे अलीकडे दिसत आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मसनेप्रमुख राज ठाकरे यांची सरकार स्थापन झाल्यापासून अनेकवेळा भेटीगाठी होत आहे. त्यामुळे शिंदे गट, भाजपा आणि मनसेच्या युतीची चर्चा रंगली आहे.2 / 6मुंबई भाजपच्यावतीने सातत्याने खासगी कंपन्यांकडून मनसेसोबतच्या युतीबाबत सर्वेक्षणे केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याचदरम्यान भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांनी भाजपा आणि मनसेच्या युतीला विरोध केला आहे. भाजपा आणि मनसे युतीची आम्हाला गरज नाही. पक्षाने जर तसा निर्णय घेतला तर माझा या युतीला विरोध राहिल, असं संजय काकडे यांनी सांगितलं. 3 / 6पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ज्यांनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत टीका केली. त्यांच्यासोबत जाऊच कसे शकतो? अशा लोकांबरोबर जाण्याची गरज नाही. मोदींवरील टीकेबाबत राज ठाकरे यांनी आधी उत्तर द्यावे, मगच पुढे बोलू, असंही संजय काकडे यांनी सांगितलं. संजय काकडेंच्या या भूमिकेमुळे भाजपा आणि मनसेच्या युतीवर प्रश्न निर्माण झाला आहे. 4 / 6दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी भाजपाने मास्टरप्लॅन तयार केला आहे. भाजपा मनसेशी थेट युती टाळण्याची शक्यता आहे. मात्र शिंदे गट मनसेशी युती करुन जागा देणार असल्याचं बोललं जात आहे. 5 / 6मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत भाजपाकडून मनसेला अदृश्य हातांनी मदत केली जाणार आहे. शिंदे गटाने मनसेशी युती करुन त्यांना जागा द्याव्या. शिंदे गटाने मनसेच्या ताकदीनुसार त्यांना जागा देणे, असा भाजपाचा मास्टरप्लॅन आहे.6 / 6 मनसेकडे अनेक प्रभागात चांगले उमेदवार नाही. त्यामुळे त्यांचा वापर ठाकरे गटाची मतं फोडण्यासाठी करता येईल, असा भाजपाचा प्लॅन आहे. तसेच ज्या जागांवर मनसेचं वर्चस्व आहे, असा जागांवर भाजपाकडून उमेदवार दिला जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे याचा राज ठाकरेंना फायदा होणार की तोटा, हे आगामी काळातच समोर येईल.