Join us

पालखी निघाली राजाची...; ना भक्तांची गर्दी, ना थाटात मिरवणूक, साश्रूनयनांनी बाप्पाला निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 2:49 PM

1 / 15
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजन पडलं. कोरोनामुळे अनेक निर्बंध सरकारने लादले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्यानं राज्य सरकारने विशेष खबरदारी घेत गणेशोत्सव साजरा करण्याबाबत नियमावली जारी केली होती.
2 / 15
यंदाच्या गणेशोत्सवात लोकांनी कुठेही गर्दी करू नये. सार्वजनिक मंडळातील गणपतीची मूर्ती ४ फूटापेक्षा जास्त उंचीची नसावी. लोकांनी मंडपात दर्शन न घेता ऑनलाईन दर्शन घ्यावे. असे विविध नियम राज्य सरकारकडून लावण्यात आले होते.
3 / 15
मुंबईतील गणेशोत्सव म्हटला तर गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर उत्साह, जल्लोष प्रचंड गर्दीत बाप्पाला निरोप दिला जातो. दरवर्षी अनंत चतुर्दशीदिवशी लालबाग परिसर भक्ताने तुडूंब भरलेला दिसतो. परंतु गेल्या २ वर्षापासून संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट पसरलं आहे.
4 / 15
गणेशोत्सव काळात लालबाग परिसर गणेशभक्तांच्या भक्तीचं शक्तीस्थळ बनतं. शहराच्या कानाकोपऱ्यातून भक्त लालबाग परिसरात गर्दी करत आहे. भक्तांच्या गर्दीत गणपती बाप्पा वाजत-गाजत त्यांच्या गावी जायला निघतात. निरोपावेळी काढण्यात येणारी मिरवणूक ही गणेश भक्तांसाठी पर्वणी असते.
5 / 15
मात्र यंदाच्या कोरोना काळात मिरवणूक काढण्यावर बंदी आणण्यात आली आहे. विसर्जनासाठी सरकारने नियमावली आखून दिली आहे. त्यामुळे १० जणांच्या उपस्थितीत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. लालबाग परिसरात लालबागचा राजा, गणेश गल्लीतील मुंबईचा राजा. तेजूकाया गणपती असे प्रसिद्ध गणपतींची मिरवणूक निघते.
6 / 15
लालबागच्या रस्त्यावर लोकांची गर्दी दिसून येते. परंतु यंदा या गर्दीला कोरोनाचं ग्रहण लागलं आहे. कोरोनामुळे गर्दी करु नये असं आवाहन सरकारकडून केले गेले आहे. त्यात मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत लालबाग परिसरातील रस्ते केवळ गणपतीच्या मार्गक्रमणासाठी मोकळे केलेत.
7 / 15
यावर्षीचा लालबागचा परिसर पाहून नक्कीच गणेशभक्तांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. ज्याठिकाणी भक्तांचा महापूर येतो तिथे आज पोलिसांच्या गराड्यात बाप्पाची मिरवणूक अगदी शांततेने जात आहे. आसपासच्या परिसरात राहणारे रहिवासी आपल्या घरच्या खिडक्यांमधून, इमारतीहून बाप्पांला निरोप देत आहेत.
8 / 15
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे विघ्न डोक्यावर घोंगावत असतानाच भक्तांच्या लाडक्या बाप्पाला साश्रूनयनांनी निरोप दिला जात आहे. विघ्नहर्त्याची मनोभावे पूजा करताना सगळ्यांच्याच मनात कोरोनाचे संकट लवकर टळावे, हीच कामना होती. त्याच भावनेने भक्तांनी उत्साहात कुठेही कमतरता न ठेवता श्रीगणेशाचे स्वागत केले.
9 / 15
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने गुन्हेगार आणि बेकायदेशीर कारवायांविरोधात मुंबई पोलिसांनी राबविलेल्या ऑल आउट ऑपरेशनअंतर्गत तीन तासांत मुंबईतील २०८ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या दरम्यान ७,८१० वाहनांची झाडाझडती घेण्यात आली
10 / 15
दक्षिण मध्य मुंबई म्हणजे लालबाग-परळ हा परिसर मुंबईची एका अर्थाने सांस्कृतिक राजधानी आहे. इथल्या सणांना, उत्सवांना एक वेगळीच झालर असते. गणेशोत्सव काळात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. सिने कलावंतांसह विविध पक्षांचे राजकीय नेतेही राजाच्या दर्शनासाठी हजेरी लावतात.
11 / 15
मागच्या वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने गणेशोत्सव साजरा करणार नसल्याची भूमिका घेतली. त्या ऎवजी आरोग्य उत्सवाच्या माध्यमातून उपक्रम घेण्यात आले. यंदाच्या वर्षी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
12 / 15
लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटी इथं विसर्जन करण्यात येणार आहे. मुंबई पोलीस आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. लालबागच्या राजाची मिरवणूक निघताना कुठेही गर्दी होणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घेतली आहे.
13 / 15

14 / 15

15 / 15

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनLalbaugcha Rajaलालबागचा राजाcorona virusकोरोना वायरस बातम्या