Join us

Ganeshotsav 2018 : गणराज रंगी रंगतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 1:42 PM

1 / 9
लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. घराघरांसहीत तील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचीही लगबग सुरू झाली आहे. मंडप उभारणीसह देखाव्यांसाठी कार्यकर्त्यांचे जोरदार नियोजन सुरू आहे. (फोटो - दत्ता खेडेकर)
2 / 9
शहरातील गणपती कारखान्यांमध्ये लगबग पाहावयास मिळत आहे. वाढलेली गणपतींची संख्या, पडणारा पाऊस आणि डेटलाईनच्या गणितामुळे रात्रंदिवस काम सुरू आहे. गणेशाच्या विविध प्रकारातील सुंदर आणि आकर्षक अशा गणेशमूर्ती तयार केल्या जात असून त्या बुकींगसाठी कारखान्यांत गर्दी झाली आहे.
3 / 9
कारखान्यांमध्ये गणपतीच्या मूर्तीवर कारागीर अखेरचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लाडक्या गणरायाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.
4 / 9
शाडूच्या मातीच्या मूर्तीही बनवल्या जात आहेत परंतु आताचे युग हे धावपळीचे व आधुनिक युग असल्याने प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीची मागणी जास्त असल्याचे मूर्तिकार सांगत आहेत.
5 / 9
राज्य शासनाने श्री गणरायाच्या मूर्ती व राख्या यांना जीएसटीमधून वगळले आहे.
6 / 9
मात्र गणपती बनविण्यासाठी प्लॅस्टर आॅफ पॅरिस, रंग आदी कच्च्या मालाला जीएसटी लावण्यात आला आहे.
7 / 9
त्यामुळे कच्च्या मालाची किंमत वाढली असून कारागीरांची मजुरीदेखील वाढली आहे.
8 / 9
त्यामुळे गणपतीच्या मूर्तीच्या किमतीतदेखील काही प्रमाणात वाढ झाली आहे.
9 / 9
त्यामुळे गणपतीच्या मूर्तीच्या किमतीतदेखील काही प्रमाणात वाढ झाली आहे.
टॅग्स :ganpatiगणपतीGaneshotsavगणेशोत्सवMumbaiमुंबई