Join us

Ganpatrao Deshmukh : एसटीमध्ये आता आमदाराचे सीट राखीव ठेवण्याची गरज नाही, नेटीझन्सचा सॅल्यूट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 3:54 PM

1 / 12
सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी शुक्रवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास सोलापुरातील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
2 / 12
पोटावरील शस्त्रक्रियेनंतर गेले अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. मृत्यूसमयी ते ९४ वर्षांचे होते. आबासाहेब म्हणून ते उभ्या महाराष्ट्राला परिचित होते.
3 / 12
पोटावरील शस्त्रक्रियेनंतर गेले अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. मृत्यूसमयी ते ९४ वर्षांचे होते. आबासाहेब म्हणून ते उभ्या महाराष्ट्राला परिचित होते.
4 / 12
सांगोल्यात पंचायत समिती कार्यालयापासून कचेरी रोड, अण्णाभाऊ साठे पुतळा, जयभवानी चौक, नगर परिषदेसमोरून नेहरू चौक, स्टेशन रोडमार्गे आणल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.
5 / 12
एका ध्येय्यवादी, एकनिष्ठी राजकीय नेत्यावर आणि सांगोलाकरांच्या आबासाहेबांवर सूरगिरणीच्या आवारात दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार झाले.
6 / 12
विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी मोडला.
7 / 12
राज्याच्या विधानसभेत 54 वर्षे सन्मानाने प्रवेश मिळवूनही त्यांचा साधेपणाच त्यांच्या मोठेपणाची साक्ष देत होता. म्हणूनच आबांच्या निधनानंतर मोठा जनसागर त्यांच्या अंत्यसंस्काराला उसळला.
8 / 12
सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर लिखाण करण्यात आलं. त्यानंतर, सोशल मीडियातून आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या आठवणी जागविण्यात आल्या.
9 / 12
सोशल मीडियात त्यांच्या बसने प्रवास करण्याच्या किस्स्यांनी अनेकांना लिहतं केलं, बोलतं केला. त्यामुळेच त्यांचा बसमधून उतरतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. तर, या फोटोसोबत फिरणारेही कॅप्शनही विचार करायला भाग पाडणार आहे.
10 / 12
गणपत आबा गेले, आता एसटी बसमध्ये आमदारांसाठी राखीव असलेली जागा बंद केली तरी चालेल, अशा आशयाचा मेसेज व्हायरल होत आहे. आबा हेच एसटीने प्रवास करणारे शेवटचे आमदार असल्याचं दिसून येतंय.
11 / 12
प्रचंड साधी राहणीमान असलेले गणपतराव देशमुख विरळेच. नेहमी एसटीने फिरणाऱ्या गणपतरावांनी कधीच बडेजाव केला नाही. गणपतराव देशमुख अत्यंत साधे होते.
12 / 12
मुंबईतील विधानसभेचं अधिवेशन असो की नागपूरचे हिवाळी अधिवेशन ते प्रत्येक अधिवेशनाला एसटीनेच जायचे. २०१७मध्ये झालेल्या नागपूर अधिवेशनालाही ते एसटीनेच आले होते. ते कुठेही जायचे असेल तर एसटीनेच जायचे.
टॅग्स :Ganpatrao Deshmukhगणपतराव देशमुखDeathमृत्यूMLAआमदारsangole-acसांगोलाSolapurसोलापूर