Get ready for the Hurricane Crisis, emergency machinery
ओखी चक्रीवादळाचा तडाखा, आपत्कालीन यंत्रणा सज्ज By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2017 4:45 PM1 / 7ओखी चक्रीवादळामुळे मंगळवारी (5 डिसेंबर) सकाळपासून मुंबई व परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.2 / 7हवामान खात्याने दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे मुंबई, ठाणे परिसरातील शाळांना सुट्टी देण्यात आली. 3 / 7ओखी चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र या भागांत येत्या 24 तासांत आणखी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.4 / 7पावसामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक मंदावली होती. 5 / 7दरम्यान, पावसामुळे अनेकांनी घरीच थांबण्यास पसंती दिली.6 / 7ओखी चक्रीवादळामुळे 5 ते 7 डिसेंबर या कालावधीत समुद्रात पाच मीटरपेक्षा उंच लाटांची भरती येण्याची शक्यता आहे.7 / 7समुद्रकिनाऱ्याजवळील परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications