Join us

गिरगावचा पाडवा : माधवबाग पटांगणात साकारली भव्य रांगोळी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 5:55 PM

1 / 7
मुंबई : गिरगावमधील भुलेश्वरजवळ असलेल्या माधवबाग पटांगणात भव्य अशी रांगोळी साकारण्यात आली आहे.
2 / 7
'स्वास्थ्यरंग' आणि 'रंगशारदा'च्यावतीने गुढी पाडव्याचे औचित्य साधून 7000 चौरस फुटांची ही रांगोळी पर्यटन महाराष्ट्राचे या संकल्पनेवर आधारीत आहे.
3 / 7
'स्वास्थ्यरंग'चे अध्यक्ष डॉ. तेजस लोखंडे तसेच 'रंगशारदा'चे प्रसाद मुंढे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 16 कलाकारांनी सलग 9 तास मेहनत घेत ही रांगोळी साकारली आहे.
4 / 7
'स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान'तर्फे आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा अर्थात गिरगावचा पाडवा यावर्षी देखील मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
5 / 7
18 मार्च म्हणजेच रविवारी सकाळी 8 वाजता गणेश मंदिर इथून स्वागत यात्रेचा प्रारंभ होईल.
6 / 7
स्वागत यात्रेचे हे 16 वे वर्ष असून 'पर्यटन महाराष्ट्राचे' या विषयावर यात्रा आधारित आहे.
7 / 7
'अविस्मरणीय अनुभूतींची, भ्रमंती महाराष्ट्राची' अशी यात्रेची संकल्पना आहे. (सर्व फोटो- दत्ता खेडेकर)
टॅग्स :gudhi padwaगुढी पाडवाMumbaiमुंबई