Join us

म्हणून मुंबईच्या मुली स्वत:ला समजतात ‘डॅशिंग’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2018 2:15 PM

1 / 6
मुंबईची पोरगी म्हटल्यावर तुमच्या डोक्यात आधी काय विचार येतो? डॅशिंग, बिंधास्त, डेरिंगबाज वगैरे. पण या पलीकडेही मुंबईच्या पोरींची एक वेगळी ओळख आहे. सुसंस्कारी असल्या तरीही वेळ पडलीच तर समोरच्याला धुळ चारायलाही कमी पडणार नाहीत. आपण आज पाहणार आहोत की, मुंबईच्या मुली इतर शहरातील मुलींपेक्षा का वेगळ्या आहेत.
2 / 6
अरुंद रस्त्यावरून चालताना आपला इतरांना त्रास होणार नाही आणि इतर आंबट शौकिन लोकांचा स्पर्श होणार नाही याची दक्षता घेऊन चालण्याची शिस्त मुंबईकर मुलींमध्येच आढळून येते. त्यामुळे अॅडजस्ट करणं हे मुंबईकर मुलींच्या रक्तातच असल्याचं म्हटलं जातं.
3 / 6
मुंबईतील मुली एकट्या कुठेही भटकू शकतात. त्या सोलो ट्रव्हलर आहे. मुंबईसारख्या गजबजलेल्या ठिकाणी ज्या मुली अगदी बिंधास्त फिरू शकतात, त्या मुली जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात एकट्या राहू शकतात. या मुलींना स्वंतत्र राहण्याचं जणू बाळकडूच पाजलेलं असतं. त्यामुळेच आज तुम्ही ट्रेनमधून येता-जाता पाहू शकता पुरुषांपेक्षाही महिलांच्या डब्यातच जास्त गर्दी असते.
4 / 6
तुम्ही कधी गुढीपाडव्याला गिरगावसारख्या विभागात फेरफटका मारला तर तुम्हाला मुंबईच्या मुलींचं एक वगेळं रुप दिसेल. एकदम पारंपारिक वेशात रॉयल एनफिल्ड, अॅवेंजरसारख्या बाईकवर राईड करताना दिसतील. त्यांचा हाच अॅटीड्यूड त्यांची ओळख निर्माण करतो. नव्या जुन्या गोष्टींना एकरूप करण्याचं तंत्र या मुंबईच्या मुलींना अवगत असल्याने त्या नेहमीच एका वगेळ्या लुकमध्ये दिसतात
5 / 6
तुम्हाला मुंबईची मिथिला पालकर आठवतच असेल. दादरच्या एका चाळीत राहणारी ही तरुणी आता कित्येकांची आवडती बनली आहे. तिचं उदाहरण द्यायचं कारण म्हणजे मुंबईमध्ये कोण कुठं राहतं यावर काहीच अवलंबून नाही. प्रत्येकीनं आपल्या जोरावर आपलं करिअर सुरू केलंय आणि त्या करिअरमध्ये यशही मिळवलंय
6 / 6
साध्या सरळ वाटणाऱ्या एखाद्या मुलीच्या तोंडून तुम्ही जर शिव्या एकल्या तर नवल वाटायला नको. मुंबईच्या मुली स्वत:हून कोणाच्या वाट्याला जात नाहीत. पण कोणी तिच्या वाट्याला गेलंच तर ती कोणालाही सोडत नाही. मग तुम्हाला तिच्या गोड शब्दांचे बोल स्तुतीसुमनं तुम्हाला ऐकावीच लागणार. त्यामुळे एखादी मुलगी तुम्हाला साधी सरळ आणि अबोल वाटली तरी त्या ‘अबले’चा फायदा घेण्याचा अजिबात विचार करू नका.