Join us

Gold Rate Today: सोन्याच्या पुन्हा किंमतीत घसरण; चांदीचा दरही कमी, काय आहे आजचा भाव?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 2:48 PM

1 / 5
भारतीय सराफा बाजारात सोने - चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,०७० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४८,०७० प्रति १० ग्रॅम आहे.
2 / 5
पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,४९० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,७१० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,०७० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,०७० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६३६ रुपये आहे.
3 / 5
गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६३,६०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
4 / 5
विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.
5 / 5
लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी