Join us  

Gold Rate Today: सोन्याचा किंमतीत घसरण, चांदीचा दर मात्र वाढला; काय आहे आजचा भाव?, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 4:06 PM

1 / 5
आगामी धनत्रयोदशीपूर्वी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. आज मल्टी कमोडिटी (MCX)वर सोन्याच्या किमतीत 0.10 टक्क्यांनी घट झाली आहे. या घसरणीनंतर सोने 47,765 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आले आहे.
2 / 5
आज चांदीच्या दरात वाढ (Silver Rate Today) झाली आहे. एमसीएक्सवर चांदी 0.09 टक्क्यांच्या वाढीसह 65050 रुपयांवर व्यवहार करत आहे.
3 / 5
गेल्या वर्षी MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत या दिवशी 51,079 रुपये होती, आज सोन्याची किंमत 47,765 रुपये आहे. अशा स्थितीत अजूनही 3,314 रुपये विक्रमी पातळीपेक्षा स्वस्त विकले जात आहेत.
4 / 5
विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.
5 / 5
लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला 4.9375 ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी