Gold Rate Today: Gold prices rise again, silver prices also rise
Gold Rate Today: सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ, चांदीचा दरही वाढला; काय आहे आजचा भाव?, जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 12:26 PM1 / 5 गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा किंमतीत सातत्याने घसरण सुरु आहे. त्यामुळे सोन्याचा भाव सात आठवड्यांतील निचांकी स्तरावर पोहोचला आहे. मात्र, बुधवारी सोन्याच्या भावात किंचीत तेजी पाहायला मिळाली.2 / 5 मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर डिसेंबर फ्युचर गोल्डची किंमत 0.13 टक्क्यांनी वाढली आहे. यानंतर सोन्याचा भाव 46, 015 रुपये प्रति तोळावर आहे. तर डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या चांदीची वायदे किंमत 0.17 टक्क्यांनी वाढली आहे. या वाढीनंतर दर 60,568 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.3 / 5दरम्यान, आगामी काळ सणासुदीचा असल्याने सोन्याचे भाव पुन्हा वरच्या दिशेने प्रवास करु शकतात. डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याचा भाव पुन्हा 52 हजार रुपये प्रतितोळा इतका होईल, असेही सांगितले जात होते.4 / 5विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. 5 / 5 लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला 4.9375 ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला. आणखी वाचा Subscribe to Notifications