Gold Rate Today: Gold prices rise again, silver prices rise; What is today's price ?, lets know
Gold Rate Today: सोन्याचा दर पुन्हा वाढला, चांदीचा भावही वाढला; काय आहे आजचा भाव?, जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 11:48 AM1 / 5सोन्याच्या किंमतीत आज पुन्हा थोडीशी वाढ पाहायला मिळाली आहे. एमसीएक्सवर आज डिसेंबरच्या सोन्याची वायदे किंमत 0.38 टक्क्यांनी वाढून 45,942 प्रति तोळाच्या आसपास पोहचला आहे. तर चांदीचे दर 0.18% नी वाढून 58,490 प्रति किलोग्रावर पोहचले आहेत. 2 / 5जागतिक बाजारात, सोन्याच्या किंमती वाढल्या पण अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे सात-आठवड्यांच्या निचांकावरच दर आहेत. बुधवारी, स्पॉट सोने 0.2% वाढून 1,729.83 डॉलर प्रति औंस झाले. डॉलर निर्देशांक आज किंचित घसरला, परंतु बुधवारी एका वर्षाच्या उच्चांकावर राहिला होता, ज्यामुळे इतर चलनांमध्ये खरेदीदारांसाठी सोन्याची किंमत वाढली.3 / 5दरम्यान, आगामी काळ सणासुदीचा असल्याने सोन्याचे भाव पुन्हा वरच्या दिशेने प्रवास करु शकतात. डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याचा भाव पुन्हा 52 हजार रुपये प्रतितोळा इतका होईल, असेही सांगितले जात होते.4 / 5 विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. 5 / 5 लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला 4.9375 ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला. आणखी वाचा Subscribe to Notifications