Join us

Gold Rate Today: सोन्याचा दर पुन्हा वाढला, चांदीच्या किंमतीतही वाढ; काय आहे आजचा भाव?, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 3:31 PM

1 / 5
दिवाळी आधीचं सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. MCX वर डिसेंबर डिलिवरी सोन्यात 30 रुपयांनी वाढ झाली आहे. बुधवारी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47499 रुपये आहे.
2 / 5
आज गुरूवारी सोन्याचा दर 47529 रुपये इतका आहे. आज सकाळी 10 वाजता सोन्याचा दर 66 रुपयांनी वाढला असून 47656 रुपये आहे. 
3 / 5
चांदीच्या दरात 218 रुपयांनी वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे आता चांदीचा दर 65825 रुपये प्रति किलो आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरीही हा दर गेल्यावर्षीच्या तुलनेत कमीच आहे. 
4 / 5
विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.
5 / 5
लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला 4.9375 ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदीbusinessव्यवसाय