Join us

अतिथि देवो भव : ! जगभरातील निर्वासितांना भारताने दिला आश्रय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 3:08 PM

1 / 5
तिबेटमधून भारतात स्थायिक झालेले बौद्ध स्थलांतरित बांधव. हिमाचल प्रदेशात धर्मशाला येथे त्यांचे मुख्य केंद्र आहे. 1959 साली बौद्ध धर्मगुरु 14 वे दलाई लामा भारतात स्थायिक झाले. त्यांच्याबरोबर 60,000 बौद्ध भारतात आले.
2 / 5
बांगलादेशच्या चितगांव हिल्स टेरिटरी मधून चकमा आणि हाजोंग भारतात आले. चकमा आणि हाजोंग यांना नुकतेच भारताचे नागरिकत्त्व देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.
3 / 5
श्रीलंकेतील यादवीला कंटाळून व जीव वाचवण्यासाठी 1 लाख तमिळ भारतात आले. त्यातील मोठ्या संख्येने स्थलांतरित तामिळनाडूत कोईंबतूर, तिरुचिरापल्ली येथे राहतात.
4 / 5
बेने इस्रायली आणि बगदादी ज्यू मुंबईत स्थायिक झाले. दक्षिण मुंबईत फोर्ट परिसरामध्ये क्नेसेट इलियाहू हे जुने सिनेगॉग आहे. आजही येथे ज्यू बांधव प्रार्थना करतात.
5 / 5
इराणमधून आलेला पारशी समुदाय गुजरात आणि मुंबईमध्ये स्थायिक झाला. सध्या पारशी समुदायाची लोकसंख्या अत्यंत कमी असून पारशी लोकांनी नवरोज तसेच इतर सण आजही कायम ठेवले आहेत. व्यापार व उद्योगात पारशी समुदाय अग्रेसर आहे.