Hail! Keep precious in life to me guard of honor by police, CM uddhav thackeray
मानवंदना ! आयुष्यातील अनमोल ठेवा By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 2:40 PM1 / 8मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पोलिस प्रशिक्षण केंद्र, मरोळ येथे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन संचलन समारंभ पार पडला. 2 / 8यावेळी त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलाशी संवाद साधला. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यावेळी उपस्थित होते. 3 / 8मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह कॅबिनेटमंत्री आदित्य ठाकरेही या सोहळ्याला उपस्थित होते. आदित्य यांनी ट्विटरवरुनही याबाबत माहिती दिली आहे. 4 / 8पोलिसांचे संचलन आणि मानवंदना यांचा सन्मान स्वीकारण्याची संधी मिळाली हा आयुष्यातील अनमोल ठेवा आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. 5 / 8 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या वतीने मुंबई पोलिस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मरोळ येथे बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन केले. 6 / 8या प्रकल्पात प्रशासकीय इमारत, विश्रांतीगृह, वसतीगृह, क्रीडासंकुल आणि सर्व सुविधायुक्त 448 सदनिकांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यात तळमजल्यासह सात मजल्यांच्या 16 इमारतींचा समावेश असणार आहे. 7 / 8 महाराष्ट्र पोलिसांना जगातील सर्वोत्तम गोष्टी उपलब्ध करून देऊ, अशा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. 8 / 8 पोलीस नेहमीच तणावात असतात, त्यामुळे नववर्षात त्यांना तणावमुक्त करण्याची जबाबदारी शासन घेईल असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पोलिसांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आणखी वाचा Subscribe to Notifications