1 / 5हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार गुरुवारी पहाटेपासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये पावसाने चांगलचा जोर धरला आहे.2 / 5पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून अप-डाऊन दिशेच्या गाड्या 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. 3 / 5सतत पडत असलेल्या पावसामुळे दादर, परळ, माटुंगा, सायन, हिंदमाता या सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. 4 / 5रस्त्यांवर पाणी साचल्याने मुंबईतील रस्ते वाहतूक मंदावली आहे.5 / 5रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बच्चेकंपनी खेळण्याचा आनंद लुटत आहेत.