heavy rainfall hits hindmata, parel,dadar, thane
आधीच कोरोना, त्यात पावसाळा; धो-धो पावसाने मुंबईचं काय केलं बघा! By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 9:03 PM1 / 8मुंबई शहर उपनगरासह ठाणे परिसरात शनिवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. विशेषत: मुंबई शहरासह उपनगरात पावसाने अजूनही चांगलाच जोर पकडला आहे. 2 / 8अजूनही मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचा जोर कायम आहे.3 / 8हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अद्याप तरी मुंबईत अतिवृष्टी झाली नसली तरी दुपारपर्यंत लागून राहिलेल्या पावसाने मुंबईकरांना काहीसा मनस्ताप झाल्याचे चित्र होते. 4 / 8कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांसाठी वर्तविलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या अधून मधून जोरदार सरी पडत राहतील. काही ठिकाणी अतिजोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.5 / 8पावसाचा वेग कमी असल्याने सखल भाग वगळले तरी फार काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या नाहीत. मात्र रस्ते वाहतूकीसह मुंबापुरीचा वेग मंदावला होता. 6 / 8पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते.7 / 8गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचं संकट असताना मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे आणखी हाल झाले आहे.8 / 8पावसामुळे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याला देखील उधाण आले होते. समुद्रकिनारी उंच लाटा उसळत होत्या. आणखी वाचा Subscribe to Notifications