Join us

Photo: सावरकरांमध्ये दिसले "हिंदुहृदयसम्राट" बाळासाहेब ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 6:09 PM

1 / 8
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरुन चांगलाच गदारोळ माजला असून भाजपासह शिंदे गटही आक्रमक झाला आहे. शिंदे गटाकडून राहुल गांधींवर टीका होतेय.
2 / 8
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन असून राहुल गांधींनीही भारत जोडो यात्रेतून बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले. मात्र, सावरकरांबद्दल त्यांनी केलेल्या विधानावरुन राज्यात वाद निर्माण झाला आहे.
3 / 8
राहुल गांधींच्या विधानाला प्रत्युत्तर देत देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावकरांची महती सांगितली. तसेच, राहुल गांधींना सावकरांचा इतिहास माहिती नसून ते अपप्रचार करत असल्याचंही ते म्हणाले.
4 / 8
'काँग्रेसच्या वतीने सावरकरांबद्दल रोज खोटं बोललं जात आहे. स्वातंत्र्य लढ्यात असलेल्या सर्वांचा मला आदर आहे. पण अत्याचार सहन करणारा सावरकारांसारखा एक नेता दाखवा.
5 / 8
अंदमानमध्ये सावरकर गेले नसते, तर शेकडो कैद्यांनी आत्महत्या केली असती किंवा ते वेडे झाले असते. राहुल गांधी यांना सावरकरांचा स देखील माहीत नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली.
6 / 8
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरीता, 'वारसा विचारांचा' या कार्यक्रमाचे मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, दादर येथे आयोजन करण्यात आले होते.
7 / 8
या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते. यावेळी, हिंदुह्रदयसम्राट म्हणून स्वातंत्र्यवीर सावकर यांचाही फोटो दोन्ही नेत्यांनी दाखवला.
8 / 8
या कार्यक्रमात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत सावरकर यांची एकच प्रतिमा रेखाटण्यात आली होती. त्यावरही, हिंदुह्रदयसम्राट असे नाव लिहिले होते. त्यामध्ये, सावरकरांच्या फोटोतच बाळासाहेबही दिसून येतात.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधीEknath Shindeएकनाथ शिंदे