History of tall Ganesha idols in Mumbai
मुंबईतील उंच गणेशमूर्तींचा इतिहास...! पहिली उंच मूर्ती कुणी साकारली? By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 11:50 AM1 / 12मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली तेव्हा अशा उंच मूर्तींची काही क्रेझ नव्हती. मग मुंबईत गणपतीच्या मूर्तीची उंची वाढली कशी?2 / 12सन १९७७ मध्ये लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने म्हणजेच गणेशगल्लीनं सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केलं होतं. त्यावेळी सुप्रसिद्ध मूर्तीकार मास्तर दिनानाथ वेलिंग यांनी भारतातील पहिली २२ फुटी गणेशमूर्ती साकारली होती.3 / 12कमळावर विराजमान असलेल्या या महाकाय मूर्तीनं मुंबईकरांचं लक्ष वेधलं होतं आणि संपूर्ण शहरात चर्चा झाली. मास्तर वेलिंग यांच्या कलेची ताकद म्हणजे मूर्तीची भव्यता तर होतीच पण मूर्तीत असा सजीवपणा साकारत की सर्व गणेशभक्त मंत्रमुग्ध होत.4 / 12गणेशगल्ली मंडळाचा १९८१ सालचा २२ फूटी उंच बाप्पा. 5 / 12मास्तर वेलिंग यांनी गणेशगल्लीच्या मंडळासाठी १९७७ ते १९८९ या १३ वर्षात वेगवेगळ्या रुपातील २२ फुटी गणेशमूर्ती साकारल्या होत्या. २२ फुटी गणेशमूर्तीची मुहूर्तमेढ याच मंडळानं रोवली त्यामुळे आजही बोल बोल बोल २२ फुटवाले की जय अशी घोषणा मंडळाकडून दिली जाते.6 / 12खेतवाडी ११ व्या गल्लीतील मंडळानं २००७ रोजी साकारलेला उंच बाप्पा. हीच गल्ली पुढे मुंबईचा महाराजा म्हणून प्रसिद्धीस आली.7 / 12खेतवाडी ११ व्या गल्लीतील मंडळाची २००६ सालची उंच गणेशमूर्ती.8 / 12२००३ सालचा मुंबईचा महाराजा...अर्थात खेतवाडी ११ व्या गल्लीचा उंच बाप्पा. मंडळानं दरवर्षी उंच गणेशमूर्ती साकारण्याची प्रथा कायम ठेवली.9 / 12मुंबईचा महाराजा मंडळाकडून दरवर्षी ३० ते ३५ फुटी मूर्ती साकारल्या जाऊ लागल्या. 10 / 12मंडळानं २००१ मध्ये २५, ३० नव्हे ४२ फूट उंच मूर्ती साकारुन नवा विक्रम केला. विष्णू अवतारातील ही मूर्ती पाहण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. 11 / 12मुंबईचा महाराजा मंडळानं २०२२ साली तब्बल ३८ फूट उंच बाप्पा साकारला.12 / 12मुंबईचा महाराजा मंडळानं यंदा तर थेट ४५ फुटांचा बाप्पा साकारण्यात आलाय. ही मूर्ती मूर्तिकार कृणाल पाटील यांनी साकारलीय. आणखी वाचा Subscribe to Notifications