Join us

महाराष्ट्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा ‘लोकमत’तर्फे सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 2:45 PM

1 / 11
लोकमत 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्काराने टाटा मोटर्स (मुंबई) यांचा सन्मान करण्यात आला. मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात टाटा मोटर्सला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
2 / 11
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लोकमत महाराष्ट्र ऑफ द इयर सोहळ्यात पॉवर आयकॉन म्हणून गौरवण्यात आलं.
3 / 11
राज्याच्या मंत्रिमंडळातले दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांचा लोकमतकडून सन्मान करण्यात आला. वरिष्ठ राजकारणी या विभागात पाटील यांना गौरवण्यात आलं.
4 / 11
देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या राजकीय क्षेत्रातली उगवत्या नेतृत्वाला देण्यात येणार 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ इयर' पुरस्काराने काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना सन्मानित करण्यात आले.
5 / 11
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात' स्मृती मानधनाचा Sports Person Of The Year पुरस्कारानं गौरव
6 / 11
अमेरिकेतील लाखो डॉलरच्या पगाराची नोकरी लाथाडून भारतातील गरजू कॅन्सरग्रस्त मुलांवर उपचार करत त्यांच्यासाठी नवी संजीवनी घेऊन आलेल्या टाटा हॉस्पीटलचे प्रसिद्ध डॉक्टर श्रीपाद बाणावली यांना यंदाचा 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
7 / 11
ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
8 / 11
'न्यूड' या चित्रपटात न्यूड मॉडेलचं काम करणारी अभिनेत्री कल्याणी मुळ्ये हिला यंदाच्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे.
9 / 11
मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात डॉ. लोकेंद्र सिंग यांना 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान करण्यात आला.
10 / 11
अभिनेत्याला भूमिका साकारताना भूमिकेत शिरण्यासाठी हुबेहूब आणि साजेसा चेहरा देणारे रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ इयर' पुरस्काराने बुधवारी सन्मानित करण्यात आले.
11 / 11
आर.सी. प्लास्टो टॅन्क्स् अ‍ॅण्ड पाइप्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक विशाल अग्रवाल यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
टॅग्स :LMOTY 2019महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019