Join us

Ajit Pawar: "बाकडे वाजवू नका, तुमचं मंत्रीपद येईल का, हेच सांगता येत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2022 7:09 PM

1 / 10
राज्यात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर नवं सरकार स्थापन झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार कामकाजाला लागलं आहे.
2 / 10
आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनात अध्यक्षाची निवडणूक झाली आणि भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर विजयी झाले. राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदानाचा प्रस्ताव विधीमंडळात विविध नेत्यांनी सादर केला.
3 / 10
यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांनी राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला आणि यावेळी केलेल्या भाषणात अजित पवार यांनी नव्या सरकारची आपल्या हटके शैलीत फिरकी घेतली.
4 / 10
रविवारी विधानसभेत महाविकास आघाडीला मोठा धक्का लागला असून राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रस्तावाच्या बाजूनं १६४ मतं पडली. तर प्रस्तावाच्या विरोधात १०७ जणांनी मतदान केलं. तर ३ जण मतदानादरम्यान तटस्थ राहिले.
5 / 10
यानंतर अजित पवार यांनी आपल्या भाषणादरम्यान तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी गिरीश महाजन यांना टोला लगावला.
6 / 10
“फडणवीस जेव्हा टीव्हीवर बोलत होते, त्यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आता एकनाथ शिंदे घेतील असं सांगितलं तेव्हा एकदम पिनड्रॉप सायलेन्सच झाला.
7 / 10
कितीतरी भाजपचे लोक तर रडायलाच लागले. कोणाला काही कळेना. सगळ्या महाराष्ट्राला तो शॉक होता. गिरीश महाजनांचं रडणं तर अजून बंदच होईना. ते फेटा बांधायला दिला तर ते फेटा सोडतात आणि डोळ्याचं पाणी पुसण्यासाठी वापरतात.
8 / 10
खऱ्या अर्थानं त्यांना वाईट वाटलंय, पण आता काय करता?,” असं अजित पवार म्हणाले. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. त्यावेळी, बाक वाजवणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनाही उद्देशून त्यांनी टोला लगावला.
9 / 10
आपल्या सद्सदविवेक बुद्धीला स्मरण भाजप आमदारांनी सांगावं हे पटलंय का, असा सवाल अजित पवारांनी केला. त्यावेळी, भाजप आमदारांनी हसून दाद दिली. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बाक वाजवून दाद दिली.
10 / 10
चंद्रकांत पाटील यांनी बाक वाजवल्यानंतर अजित पवारांनी चिमटा काढला. चंद्रकांत दादा लय बाक वाजवू नका, आता तुम्हालाही मंत्रीपद मिळतय का नाही, हे अवघड बनलंय, असे पाटील यांनी म्हटले.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटील