Join us

INS Karanj : 'आयएनएस करंज' नौदलाच्या ताफ्यात दाखल, सायलेंट किलर म्हणून ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 12:43 PM

1 / 10
सायलेंट किलर म्हणून ओळखली जाणारी आयएनएस करंज पाणबुडी आज नौदलाच्या ताफ्यात सामील झाली. मुंबईतील वेस्टर्न कमांडच्या नेव्हल हेडक्वार्टरमध्ये लष्करी परंपरेनुसार करंज पानबुडीला युद्धनौकांमध्ये सामील करण्यात आले.
2 / 10
फ्रान्सच्या मदतीने आयएनएस करंजची माजगाव डॉकयार्डने (एमडीएल) निर्मिती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत स्वदेशी बनावटीच्या सहा पाणबुड्यांची बांधणी मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये करण्यात येत आहे.
3 / 10
त्यापैकीच एक असलेली आयएनएस करंज सर्व यशस्वी चाचण्यांनतर आज नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे. आयएनएस करंज ही कलावारी क्लासची तिसरी पाणबुडी आहे.
4 / 10
करंज पाणबुडी 221 फूट लांब, 40 फूट उंच, खोली 19 फूट, 1565 टन वजनाची आहे. यात मशिनरी सेटअप असा करण्यात आला आहे की सुमारे 11 किमी लांबीची पाईप फिटिंग्ज करण्यात आली आहे. करंज पाणबुडी 45-50 दिवस पाण्यात राहू शकते.
5 / 10
स्टील्थ तंत्रज्ञानाच्या मदतीने ही पानबुडी रडारमध्ये येत नाही. कोणत्याही हवामानात काम करण्यास कंरज सक्षम आहे. या पानबुडीचा टॉप स्पीड 22 नोट्स आहेत.
6 / 10
जास्त काळ प्रवासासाठी आयएनएस करंजमध्ये 360 बॅटरी सेल आहेत. प्रत्येक बॅटरी सेलचे वजन सुमारे 750 किलोग्रॅम आहे. त्यात दोन 1250 किलोवॅट डिझेल इंजिन आहेत.
7 / 10
या बॅटरीच्या जोरावर आयएनएस करंज 6500 नॉटिकल माईल्स म्हणजे सुमारे 12000 किमी प्रवास करू शकते. आयएनएस करंज 45-50 दिवसांच्या प्रवासाला जाऊ शकते.
8 / 10
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मॅग्नेटाइज्ड प्रोपल्शन मोटर, ज्याचे तंत्रज्ञान फ्रान्सकडून घेण्यात आले आहे. यामुळे पानबुडीतून येणारा आवाज बाहेर येत नाही. त्यामुळे शत्रूला या पानबुडीचा शोध घेणे कठीण जाते. (सर्व फोटो- दत्ता खेडेकर)
9 / 10

10 / 10

टॅग्स :Mumbaiमुंबईindian navyभारतीय नौदल