Jhund: 'रियल अन् रील'.... जेव्हा महानायक अमिताभ बच्चन 'झुंड'च्या नायकास भेटतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 17:38 IST
1 / 10दिग्दर्शक नागराज मंजुळे सैराटनंतर पुन्हा एकदा झुंडच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बी अमिताभ बच्चन या सुपरस्टारला घेऊन हा चित्रपट होत असल्याने या चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे. 2 / 10सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकाच्या जीवनावर आधारित झुंड या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वत: ही भूमिका साकारली आहे. 3 / 10ज्यांच्या जीवनावर हा सिनेमा साकारला ते खरे नायक प्रा. विजय बारसे हे अनेक दिवसांनंतर नागपूरकरांसमोर भरभरून बोलले. निमित्त होते त्यांच्या नागरी सत्काराचे.4 / 10झुंड हा सिनेमा प्रदर्शित होत असल्यानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून गुरुवारी संविधान चौकात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते रणजित मेश्राम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 5 / 10‘साला मै तो साहब बन गया,’ अशी काहीशी अवस्था झाली आहे; पण मी कालही जमिनीवर होतो आणि आजही जमिनीवरच आहे. फुटबॉलच्या माध्यमातून झोपडपट्टीतील व्यक्तींचा विकास हा माझा मूळ उद्देश होता. 6 / 10चित्रपट होत असताना तो मूळ उद्देश बिघडायला नको, ही माझी अट होती. काल मी चित्रपट पाहिला. तेव्हा मला खरच खूप आनंद झाला. अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांनी अतिशय तंतोतंत विजय बारसे उभा केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.7 / 10विजय बारसे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुनही अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेंसोबतचे फोटो शेअर केले आहेत. यासोबत, माझी कथा कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचल्याचे बारसे यांनी म्हटले. 8 / 10माझी कथा कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचेल, याची मी कल्पनाही केली नव्हती. पण, माझ्या कथेपेक्षाही हे अधिक आहे. माझ्या आयुष्याला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक खेळाडूची ही कथा आहे, त्यांनी परिस्थितीवर कशी मात केली याचीही कथा आहे, असे बारसे यांनी म्हटले. 9 / 10बारसे यांनी अमिताभ बच्चन आणि नागराजसह झुंडच्या टीमसमवेतचा फोटो शेअर केला आहे. यावेळी, अमिताभ यांचं स्वागत केलं, तसेच, रियल आणि रील विजय पाहून सर्वांनाच अत्यानंद झाला. 10 / 10झुंड या चित्रपटाचे ८० टक्के शूटिंग नागपूरला झाले आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांचे नाव विजय आहे; परंतु त्यांनी आपल्या जीवनात कदाचित पहिल्यांदाच खऱ्या विजयची (विजय बारसे) यांची भूमिका निभावली ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे प्रा. बारसे यांनी सांगितले.