JNU Attack : Movement: Mumbai with JNU
JNU Attack : 'इंडिया गेट' ते 'गेट वे ऑफ इंडिया' एकच नारा... आम्ही सगळे जेएनयू! By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 3:15 PM1 / 8दिल्लीतील जेएनयू हल्ल्याचा देशभरात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावरही विविध संघटनांनी निषेध व्यक्त केला.2 / 8मुंबईतील आंदोलनकर्त्यांमध्ये काश्मीर मुक्त करण्याचे फलक झळकल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले3 / 8मुंबईसह पुणे आणि राज्यातील इतर शहरांमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येत, जेएनयुतील हल्ल्याचा निषेध नोंदवला4 / 8मुंबईकर रस्त्यावर उतरले होते, या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात ज्येष्ठ आणि राजकीय पक्षाच्या संघटनांनीही सहभाग घेतला.5 / 8जेएनयू हल्ल्याचे पडसाद आणि मुंबईतील फ्रि काश्मीर या पोस्टरवरुन राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये ट्विटरवरुन शाब्दिक वॉर सुरु असल्याचं दिसून येत आहे. 6 / 8जेएनयू हल्ल्याविरोधात सुरू असलेल्या आझाद मैदानातील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. 'गेटवेवर आंदोलन करत असताना पोलिसांनी विद्यार्थ्यांना आझाद मैदानात आणलं. हजारो विद्यार्थ्यांनी हे आंदोलन यशस्वी करून दाखलं7 / 8गेटवे परिसरात जेएनयू हल्ल्याचा जोरदार निषेध करण्यात आला होता. पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदानात जाण्याची सूचना केली होती. मात्र, आंदोलक गेट वे ऑफ इंडियावरच हातात तिरंगा अन् निषेधाचे फ्लेक्स घेऊन ठाण मांडून होते.8 / 8या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ५० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. हिंदू रक्षा दलानं या हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications