Journalist Arun Sadhu passed away in Marathi literature
मराठी साहित्याला वास्तवाचे वळण देणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचं निधन By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 12:24 PM1 / 5महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनावर ठसा उमटविणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचं वयाच्या 76 व्या वर्षी सायन रुग्णालयात निधन झालं. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील परतवाडा या गावी झाला होता. 2 / 5 1972 मध्ये त्यांनी लिहिलेली 'मुंबई दिनांक' आणि 1977 मध्ये लिहिलेली 'सिंहासन' या दोन कादंबऱ्यांनी मराठी समाज मनावर विशेष प्रभाव टाकला. साधू यांनी केसरी, इंडियन एक्स्प्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, द स्टेटसमॅन आदि वर्तमानपत्रांत पत्रकारिता केली. ‘फ्री प्रेस जर्नल’चे संपादक म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला.3 / 5ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरूण साधू यांच्या निधनाने मराठी साहित्याला वास्तववादाचे वळण देणारा लेखक आपण गमावला आहे, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली4 / 5 अरुण साधू यांच्या निधनामुळे पत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील एकपरखड,व्यासंगी साहित्यिकाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. विनोद तावडे यांनी आपला शोक व्यक्त केला.5 / 5८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सुमारे ३० वर्षे पत्रकारितेत काम केल्यानंतर साधू यांनी कुठच्याही वृत्तपत्रात नोकरी न करता मुक्त लेखन आणि मुक्त पत्रकारितेलाच वाहून घेतले. आणखी वाचा Subscribe to Notifications