Khamang - The street food of delhi, you must taste this foood
खमंग - दिल्लीत या स्ट्रीट फूडची चव घ्यायलाच हवी By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 6:32 PM1 / 8दिल्लीच्या राजौरी गार्डन येथील आलू चाट आणि टिक्की चाट मसाल्याची चव चाखायलाच हवी. खाण्याचे शौकीन असलेल्यांनी येथील अतुल चाट सेंटरवर फेरफटका मारायलाच हवा.2 / 8लाजपत नगरचे सेंट्रल मार्केट शॉपिंगसोबतच, चायनिज स्टॉलसाठीही प्रसिद्ध आहे. येथील चायनिज चाट खाल, तर वारंवार येथे जाल.3 / 8पावसाळ्यात पकोड म्हणजेच शुद्ध मराठी भजे खाण्याची मजा काही औरच. पण, दिल्लीच्या सरोजनी नगरमधील खानदानी पकोडे खायलाच हवे. आलू पकोडे, कांदा पकोडे आणि मिर्ची पकोडे... 4 / 8दिल्ली आणि चांदणी चौक यांचं नातं वेगळच आहे. चांदणी चौक जसा खरेदीसाठी प्रसिद्ध आहे, तसचं येथील चाटही जबरदस्त. येथील लाला बाबू चाटवर पाणीपुरी, दहीपुरी खायलाच हवी.5 / 8छोले भटुरे हा उत्तरेकडील फेमस पदार्थ. दिल्ली आणि उत्तर भारतातील नागरिकांचा सकाळचा नाश्ता म्हणजे छोले भटुरे. येथील चांदणी चौकात लोटन के छोले-कुल्चे एकदा तरी टेस्ट कराच. 6 / 8पहाडगंज येथे जाण्याची संधी मिळाल्यास तेथील सितारामचे छोले-भुटरे खायची संधी दवडू नका.7 / 8दिल्लीच्या करोलबाग येथे जाल तर कुल्फी जरुर खाल. जेवण झाल्यानंतर फिरायला करोल बाग परिसरात जावा अन् आईसक्रीम खायची मजा घ्या.8 / 8दिल्लीच्या करोलबाग येथे जाल तर कुल्फी जरुर खाल. जेवण झाल्यानंतर फिरायला करोल बाग परिसरात जावा अन् आईसक्रीम खायची मजा घ्या. आणखी वाचा Subscribe to Notifications