kisan sabha farmers protest in mumbai azad maidan
"मये कोरोनाचं नव्हं...शेती कायद्याचं भय", पोशिंद्यांची पायपीट अन् मुंबईचं मॅनेजमेंट By मोरेश्वर येरम | Published: January 25, 2021 12:39 PM1 / 10मुंबईत आज जवळपास १२ हजार शेतकरी पायपीट करत आझाद मैदानात दाखल झाले आहेत. नव्या कृषी कायद्यांना विरोध आणि विविध मागण्यांसाठी हे शेतकरी व कष्टकरी आंदोलन करतायत. पण या आंदोलनाला कोरोनाचीही पार्श्वभूमी आहे हेही लक्षात घ्यायला हवं. (छायाचित्र: दत्तात्रय खेडेकर)2 / 10कोरोना सावटाखाली इतक्या मोठ्या मोर्चाला सांभाळणं हे काही सोपं काम नव्हतं. आझाद मैदानात ठिकठिकाणी शेतकरी मोर्चेकरांच्या आरोग्य तपासणीसाठी केंद्र उभारण्यात आली आहेत. 3 / 10शेकडो किलोमीटर रस्ता पायी तुडवत मुंबईत दाखल झालेल्या सर्व कष्टकरी आणि शेतकऱ्यांना मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे.4 / 10आपल्या पारंपारीक कलांच्या माध्यमातून शेतकरी महिला मोर्चात सहभागी झाल्या आहेत.5 / 10राज्याच्या आदिवासी बहुल भागातून हे कष्टकरी मुंबईत पायी दाखल झालेत.6 / 10कोरोनाच्या महामारीत इतक्या मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी होण्याबाबत विचारलं असता कोरोनानं नव्हे, तर नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा जीव जाईल, असं सांगत कायद्यांना विरोध दर्शवला. 7 / 10थंडी, वाऱ्याची पर्वा न करता हे कष्टकरी आपल्या मागण्यांसाठी मुंबईत दाखल झाले आहेत.8 / 10आंदोलन ठिकाणी कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी स्वत: मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आझाद मैदानात उपस्थित आहेत.9 / 10नाशिक, धुळे, नंदुरबार अशा राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत.10 / 10आझाद मैदानातून हा मोर्चा राजभवनाच्या दिशेनं कूच करणार असल्याचं किसान सभेच्या वतीने सांगण्यात आलं आहे. पण पोलिसांकडून यासाठी परवानगी देण्यात आलेली नसल्याचं विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications