Lalbaugcha Raja: Padya Pujan ceremony of the Lalbaugcha Raja is today
Lalbaugcha Raja: तुझे पायी माझी भक्ती... लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 12:56 PM1 / 7मुंबईतील गणेशोत्सवात मुख्य आकर्षण ठरणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाचा गणेशोत्सव यावर्षी साजरा होणार आहे. दरम्यान, देशविदेशातून लाखो भाविक ज्याच्या दर्शनासाठी येतात त्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा आज संपन्न झाला. 2 / 7कोरोनाचा संसर्ग आणि प्रतिबंधात्मक निर्बंधांमुळे अत्यंत साधेपणाने आणि सुरक्षितपणे हा पाद्यपूजन सोहळा पार पडला.3 / 7 दर्शनाला होणारी भाविकांची गर्दी विचारात घेऊन लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पाद्यपूजन सोहळा जाहीर न करता हा सोहळा साधेपणाने आटोपला. त्यामुळे गणेशभक्तांची होणारी गर्दी टाळता आली.4 / 7दरवर्षी लालबागच्या राजाच्या पाद्यपूजनालाही गणेशभक्तांची मोठी गर्दी होते. यंदा मात्र कोविड १९ ससंर्ग निर्बंध नियमांमुळे मंडळाने गर्दी टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली होती. 5 / 7लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे ८८वे वर्ष आहे. लालबागच्या राजाचा या वर्षीचा गणेशोत्सव यंदा शुक्रवार दि.१० सप्टेंबर २०२१ ते रविवार दि.१९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत साजरा होणार आहे.6 / 7मुंबईसह जगभरात आलेली कोरोना विषाणूची साथ आणि लॉकडाऊनच्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी लालबागच्या राजाचा उत्सव रद्द करण्यात आला होता. 7 / 7दरम्यान, आज सकाळी सहा वाजता लालबागच्या राजाचा गणेश मुहूर्त पूजन अर्थात पाद्यपूजन सोहळा संपन्न झाल्यानंतर खऱ्या अर्थाने लालबागच्या राजाच्या या गणेशोत्सवाला आजपासूनच सुरुवात झालेली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications