Join us

Lata Mangeshkar : लतादीदींचे 1.5 कोटी फॉलोअर्स, पण केवळ 9 व्यक्तींना करायच्या फॉलो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2022 2:04 PM

1 / 11
गानकोकिळा लता मंगेशकर यांचं आज मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
2 / 11
लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह देशातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला. नरेंद्र मोदी लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईला येणार असल्याचेही समजते.
3 / 11
लता मंगेशकर आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केवळ 9 जणांना फोलो करत, त्यामध्ये त्यांचे लहान बंधु ह्रदयनाथ मंगेशकर हे एक असून घरातील एकूण 4 सदस्य आहेत.
4 / 11
मास्टरब्लास्टर यांचं आणि त्यांच आई-मुलासारखं नातं होतं, शिवाय त्या क्रिकेटच्या चाहत्या. म्हणूनच सचिन तेंडुलकर यांनाही त्या ट्विटरवर फॉलो करत होत्या.
5 / 11
लता मंगेशकर त्यांची नातं म्हणजेच आशा भोसलेंची नात असलेल्या झनाई भोसलेंना लतादिदी ट्विटरवर फॉलो करत होत्या.
6 / 11
लता मंगेशकर यांच्या लहान बहिणी आणि प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनाही त्या फॉलो करत होत्या.
7 / 11
उषा मंगेशकर याही त्यांच्या बहिण आहेत, याही संगीत क्षेत्रात मोठं योगदान देत आहेत. लता दिदी त्यांनीही ट्विटरवर फॉलो करत.
8 / 11
अमिताभ बच्चन यांनाही त्या ट्विटरवर फॉलो करत होत्या. देशातील दिग्गज व्यक्तींपैकी केवळ 5 ते 8 व्यक्तींना त्या ट्विटरवर फॉलो करत होत्या, तर देशाबाहेरी केवळ दलाई लामा यांना त्या फॉलो करत होत्या.
9 / 11
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लता मंगेशकर यांचंही जिव्हाळ्याचं नातं होतं. लता दिदी मोदींना लहान भाऊ मानत. तर, मोदीही त्यांना मोठ्या बहिण मानत.
10 / 11
जगभरात शांततेचं प्रतिक मानले जाणाऱ्या दलाई लामा यांनाही लता मंगेशकर ट्विटरवर फॉलो करत होत्या. एकमेव विदेशी व्यक्ती असलेल्या दलाई लामांना त्या फॉलो करत.
11 / 11
लता दिदीं आपल्या ट्विटवर अकाऊंटवरुन चाहत्यांशी आणि दिग्गजांशी कनेक्ट होत्या. त्यामुळेच ट्विटरवर त्यांना 1.49 कोटी फॉलोअर्स आहेत, पण त्या केवळ 9 व्यक्तींना फॉलो करायच्या. त्यामध्ये, मुंबईच्या बांद्रा वेस्ट येथील अॅपल स्टोरच्या ट्विटर अकाऊंटलाही त्या फॉलो करत
टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरSachin Tendulkarसचिन तेंडुलकर