भारतात सम लैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारा भारतीय दंड विधानातील कलम ३७७ रद्द करण्यात यावा म्हणून क्यूअर आजादी मार्च यांनी मुंबई येथिल क्रांती मैदानात प्राईड रॅली आयोजित केली होती याचे काही मोजके फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. (सर्व फोटो लोकमतचे छायाचित्रकार स्वप्निल साखरे यांनी काढलेले आहेत)भारतात सम लैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारा भारतीय दंड विधानातील कलम ३७७ रद्द होऊ शकतो असे संकेत कायदामंत्री सदानंद गौडा यांनी दिले आहेत समलैंगिक विवाहांना मान्यता देण्याच्या कायद्यावरही विचारविनिमय होऊ शकतो असेही त्यांनी म्हटले आहे.अमेरिकेत समलैंगिक विवाहांना संमती देणारा कायदा मंजूर झाल्यावर भारतानेही यावर विचार करावा अशी मागणी समलिंगींसाठी काम करणा-या संस्थांकडून होत होती. सोशल मिडीयावरही अनेकांनी या निर्णयाचे समर्थन केले होतेभारतीय दंड विधानातील कलम ३७७ नुसार अनैसिर्गक संबंध ठेवणे हा गुन्हा असल्याने देशात समलैंगिक संबंध हा गुन्हा ठरतो. हा कलम रद्द करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे.भादंविच्या कलम ३७७ अंतर्गत दोन वयस्कांमध्ये परस्पर सहमतीने समलैंगिक संबंध प्रस्थापित करणे हा गुन्हा ठरविणाऱ्या निकालाची फेरतपासणी करण्याची मागणी करणारी सुधारणात्मक याचिका (क्युरेटिव्ह) सर्वोच्च न्यायालयाने पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सुपूर्द केली आहे.सर्वोच्च न्यायालयाचा ११ डिसेंबर २०१३ रोजीचा निकाल आणि पुनरीक्षण याचिकेवर फेरविचार करण्याची मागणी करणाऱ्या एकूण आठ सुधारणात्मक याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत.या प्रकरणाची सुनावणी सुरू होताच भादंविचे कलम ३७७ गुन्ह्याच्या श्रेणीबाहेर ठेवण्याचे समर्थन करणाऱ्या वकिलांपैकी एक कपिल सिब्बल यांनी ‘हे प्रकरण फार मोठ्या संवैधानिक मुद्याशी संबंधित आहे’ असे सांगितले.