The lights of the lamps tell ...
दिव्या-दिव्यांची ज्योत सांगते... By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 11:19 AM1 / 7दिवाळी म्हणजे मनातील दु:ख, काळजी, द्वेष दूर करून भरभराटीचा प्रकाश सर्वत्र पसरवणारा असा दिव्यांचा सण. 2 / 7याच मातीच्या दिव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या धारावीच्या कुंभारवाड्यात सध्या दिवाळीची जोरदार तयारी सुरू आहे. 3 / 7छोट्या पारंपरिक पणत्यांपासून ते मोठ्या कंदिलांपर्यंत दिसणाऱ्या दिव्यांनी कुंभारवाड्यातील घरे आणि दुकाने सजली आहेत. 4 / 7कुंभारवाड्यातल्या घरांत धगधगणा-या भट्ट्या, त्यातून निघणारे धुराचे लोट, ओल्या मातीचा वास.5 / 7घराघरांत ठेवलेले मातीचे ढीग आणि रंग-मातीने माखलेली रंगीत माणसे हेच चित्र दिसते.6 / 7इथल्या दिव्यांपासून सगळ्यांची घरोघरी दिवाळी साजरी होते आणि जणू आपणही इतरांचे आयुष्य असेच उजळवून टाकावे, असा संदेश हे दिवे देतात. 7 / 7अंधाराला दूर सारणा-या या दिव्यांच्या निर्मितीचा आढावा लोकमतचे वरिष्ठ छायाचित्रकार दत्ता खेडेकर यांनी घेतला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications