Lot of devotees gather to bid farewell to the king of Lalbaug
Lalbaugcha Raja 2019: लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी लोटला भक्तांचा जनसागर By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 10:55 PM1 / 7अनंत चतुर्दशीनिमित्त लाडक्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी भक्तांचा जनसागर राज्यभरातील समुद्र किनारी लोटला आहे.( सर्व छायाचित्र- सुशील कदम, स्वप्नील साखरे)2 / 7 गणेश चतुर्थीपासून ते आज अनंत चतुर्दशीपर्यंत भक्तांना दर्शन दिल्यानंतर लालबागचा राजा विसर्जनाच्या अंतिम टप्प्यात आहे. 3 / 7लालबागचा राजा श्रॉफ इमारतीजवळ पोहोचल्यानंतर त्याच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. 4 / 7तसेच लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भक्तांची लोटलेली मांदियाळी मनमोहक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली. 5 / 7मुंबईत गणपती विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. 6 / 7गेले अकरा दिवस भक्तिभावे पूजा करताना गणेशभक्तांमध्ये उत्साह असला तरी साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप दिला.7 / 7 विविध समुद्र किनारे, नद्या-तलाव तसंच कृत्रिम तलावांजवळ भक्तांनी गणपती विसर्जनासाठी गर्दी केलेली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications