आरे ते वरळीच्या ३६ मिनिटांच्या प्रवासासाठी मोजावे लागणार इतके रुपये; मिठी नदीखालून जाणार मेट्रो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 18:36 IST
1 / 7मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ भूमिगत मेट्रो ३ प्रकल्पाच्या बीकेसी ते कुलाबा या मार्गाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे2 / 7मुंबई मेट्रो ३ चे आतापर्यंत ९३.१ टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्च २०२५ अखेर प्रवासी सेवेसाठी हा मार्ग सुरु करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेतला होता. त्यांनी या प्रकल्पाचा १०० दिवसांच्या अजेंड्यामध्ये समावेश केला होता.3 / 7मुंबई मेट्रोच्या या महत्त्वाच्या टप्प्यात असलेल्या बीकेसी ते आचार्य अत्रे चौक आणि वरळी स्थानकांचे बांधकाम वेगाने सुरू असून लवकरच येथू मेट्रो सेवा सुरू होण्याच्या शक्यता आहे.4 / 7यामुळे आरे ते बीकेसी दरम्यान सुरू झालेल्या लाईन ३ चा विस्तार होणार आहे. त्यामुळे बीकेसीपासून हा मार्ग आता वरळी नाक्यापर्यंत (आचार्य अत्रे चौक स्टेशन) असणार आहे. ज्यामुळे प्रवाशांना आरे ते वरळी २२ किमीच्या भूमिगत मार्गावर नागरिकांना रस्त्याच्या खालून प्रवास करा येणार आहे.5 / 7६० रुपयांमध्ये प्रवासी लेडी जमशेटजी रोड आणि डॉ. ॲनी बेझंट रोडच्या खचाखच भरलेल्या भागाला टाळून धारावी, दादर, सिद्धिविनायक आणि वरळी सारख्या भागात जाऊ शकतील.6 / 7बीकेसी ते आचार्य अत्रे चौक या सहा स्थानकांमध्ये धारावी, शीतलादेवी, दादर, सिद्धिविनायक, वरळी आणि आचार्य अत्रे चौक या स्थानकांचा समावेश आहे.7 / 7बीकेसी ते आचार्य अत्रे चौक या सहा स्थानकांमध्ये धारावी, शीतलादेवी, दादर, सिद्धिविनायक, वरळी आणि आचार्य अत्रे चौक या स्थानकांचा समावेश आहे.