The Metro's 'Krishna One and Two' work is loud
मेट्रोच्या ‘कृष्णा वन आणि टू’ चे काम जोरात By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2018 7:22 PM1 / 6मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो भुयारी मार्ग ३ प्रकल्पाच्या भुयारी कामाला माहिम येथील नयानगरमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. माहिम येथून प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरापर्यंत हा भुयारी मार्ग खोदण्यात येणार आहे. 2 / 6हा भुयारी मार्ग दोन ते अडीच किलोमीटर लांबीचा असून, मेट्रोच्या संपूर्ण भुयारी मार्गाचे काम दोन वर्षांत पूर्ण केले जाईल. मेट्रो-३ प्रकल्पाचे खोदकाम टनेल बोअरिंग मशिनच्या मदतीने केले जात आहे. 3 / 6येथे दोन मशीन कार्यान्वित आहेत. ‘कृष्णा वन’ या मशिनद्वारे आतापर्यंत १२० मीटर भुयारी मार्गाचे काम पुर्ण करण्यात आले असून, ‘कृष्णा टू’ या मशिनद्वारे आतापर्यंत ७० मीटर भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. 4 / 6मेट्रोचा भुयारी मार्ग हा ३३.५ किमी लांबीचा आहे. खोदकामाचा वेग हा भूगर्भातील खडकावर अवलंबून आहे. त्यामुळे ८ ते १४ मीटर दररोज काम करण्याची गती या मशिनची असेल. 5 / 6खडकांचा चुरा करण्याचे वैशिष्ट्य टर्नल बोअरिंग मशिनमध्ये आहे. भुयारी मेट्रोचे काम २ वर्षांत म्हणजे २०१९ पर्यंत पूर्ण होईल. 6 / 6मेट्रो-३ ही डिसेंबर २०२१ रोजी धावेल, असा दावा मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने केला आहे. (सर्व फोटो : दत्ता खेडेकर) आणखी वाचा Subscribe to Notifications