Minister Dhananjay Munde has been accused by his second wife Karuna Munde
धनंजय मुंडेंनी माझ्या मुलांना डांबून ठेवलंय, त्यांना काही झाल्यास...; करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप By मुकेश चव्हाण | Published: February 03, 2021 5:11 PM1 / 11कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने तक्रार मागे घेतली असली, तरी मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ निर्माण होण्याची शक्यता आहे.2 / 11धनंजय मुंडे यांची दूसरी पत्नी करुणा मुंडे यांनी बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तांकडे मुंडेविरोधात तक्रार केली आहे. त्यात, गेल्या तीन महिन्यापासून मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट येथील त्यांच्या बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 3 / 11करुणा मुंडे यांनी पोलीस आयुक्ताकडे दिलेल्या अर्जामध्ये, माझे पती धनंजय मुंडे यांनी गेल्या तीन महिन्यापासून दोन मुलांना त्यांच्या चित्रकूट बंगल्यात लपून ठेवले आहेत. मला त्यांच्याशी भेटू देत नाही. २४ जानेवारी रोजी मुलांची भेट घेण्यासाठी बंगल्यावर जाताच, मुंडे यांनी ३० ते ४० पोलिसांना बोलावून मला हकलून लावले. बंगल्यावर माझी मुले सुरक्षित नाही. त्यात १४ वर्षाच्या मुलीचाही समावेश असून महिला केअरटेकरही नाही, असं म्हटलं आहे. 4 / 11मुंडे त्यांच्यासमोर अश्लील वर्तन करतात. माझ्या मुलांसोबत काही चुकीचे झाल्यास त्याला मुंडे जबाबदार असणार आहेत. जर माझ्या मुलांसोबत माझी भेट घालून दिली नाही तर २० फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार आहे. त्यामुळे चित्रकूट बंगल्यासमोर किंवा मंत्रालय आणि आझाद मैदान येथे उपोषणासाठी परवानगी दया. आणि मुंडे यांच्यावर कठोर करावाई करा अशी विनंतीही करुणा मुंडे यांनी केली आहे. 5 / 11धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीने तक्रार मागे घेतली असली तरी पुन्हा एक नवं संकट मुंडेंच्या मागे लागले आहे. 6 / 11करुणा मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे नागरिकांना आवाहनही केलं आहे. माझी सर्व देशवासियांना विनंती आहे की, आपण जेव्हा आपले अमूल्य मतदान करतो तेव्हा आपण कुठलेही विचार न करता पक्ष बघून मतदान करतो. त्या उमेदवारचा पार्श्वभूमी क्रिमिनल रेकॉर्ड शिक्षण न पाहता पक्ष पाहून मतदान करतो ही प्रथा आपल्याला बदलावी लागणार. उमेदवार गुन्हेगार अंगठाबाज असेल तर मतदान नाही उमेदवार पारदर्शक असेल तर मी मतदान करणार ही शपथ सर्वानी घेऊ, असं फेसबुक पोस्टद्वारे करुणाने म्हटलं आहे.7 / 11 कथित बलात्कार प्रकरण समोर आल्यानंतर मुंडे यांनी आपली भूमिका मांडली होती. करूणा शर्मा (मुंडे) नावाच्या एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. 8 / 11तत्पूर्वी, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने कौटुंबिक कारण तसेच या तक्रारीमुळे होत असलेल्या राजकारणामुळे माघार घेत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले होते. रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्यानंतर या विषयावरील आरोप-प्रत्यारोप थांबले होते. मात्र आता पुन्हा करणा मुंडेंनी आरोप आणि तक्रार दाखल केल्यानं राजकारण चांगलचं तापणार असल्याचे दिसून येत आहे. 9 / 11शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे. करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे असं त्यांनी आधीच सांगितले आहे.10 / 11तर मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे, मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत. मात्र, २०१९ पासून करूणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. 11 / 11 माझ्या जीविताला गंभीर शारीरिक इजा करण्याबाबत आणि धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता, असं धनंजय मुंडे यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications