Minister Dhananjay Munde has reacted emotionally after withdrawing the rape complaint
'आपल्या उपकाराची परतफेड...'; बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडेंची भावूक प्रतिक्रिया By मुकेश चव्हाण | Published: January 26, 2021 3:51 PM1 / 9गेल्या काही दिवसांआधी सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्यावर रेणू शर्माने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा प्रदेश महिला मोर्चातर्फे राज्यभर आंदोलन करण्यात आली. मात्र काही दिवसांनंतर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे धनंयज मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2 / 9धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार काही दिवसांपूर्वी मागे घेतली. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे. यासोबतच रेणू शर्मांच्या वकिलांनी देखील केस सोडल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही वेळापासून तिची बहिण (करुणा शर्मा) आणि मुंडे यांच्यात सलोख्याचे संबंध नव्हते. त्यामुळे ती मानसिक दबावाखाली होती, असं रेणू शर्माने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. 3 / 9बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आज त्यांनी या सर्व प्रकणावर भावनिक प्रतिक्रिया माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे. 4 / 9एखाद्या भगवंताचा प्रसाद असतो, तसे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, अशा कठीण प्रसंगामध्ये आपण सर्वांनी माझ्या पाठीशी साथ उभी केली. मी शब्दात आभार मानू शकत नसल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. 5 / 9 तसेच आपल्या उपकाराची परतफेड माझ्या अंगावरील कातड्याची जोडे करून जरी आपल्याला घातली तरीही ती फिटू शकत नाही, असं सांगत धनंजय मुंडे भावूक झाले. 6 / 9आजपर्यंत अनेक संकटाला सामोरे गेलो. सामान्य माणसाच्या मनामध्ये स्थान निर्माण करून आज इथपर्यंत पोहोचलो. जीवनामध्ये मी कोणाचेही मन दुखवून स्थान निर्माण केले नाही. मन जिंकून मी स्थान निर्माण केलं असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले. 7 / 9बलात्काराची तक्रार करणाऱ्या रेणू शर्माने धनंजय मुंडेंविरोधातली तक्रार मागे घेतल्यानंतरही त्यांच्यावर विविध आरोप करण्यात येत आहे. तक्रार करणाऱ्या महिलेवर ठाकरे आणि पवार यांनी दबाव टाकला. महाराष्ट्रात ठाकरे आणि पवारांचा येवढा दबाव आहे की, कोणाही विरोधात बोलू शकत नाही, असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. 8 / 9धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपासंदर्भात विचारले असता भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या की, तो विषय आता मागे पडला असून नैतिक, कायदेशीरदृष्ट्या त्या गोष्टींचे समर्थन मी करीत नाही. परंतु, हा विषय कुणाचाही असता तरी राजकीय भांडवल केले नसते आणि करणारही नाही. पण अशा प्रकारामुळे एखादे कुटुंब, त्या कुटुंबातील दोष नसलेल्यांना त्रास होतो. एक महिला म्हणून याकडे संवेदनशीलतेने पाहते, असेही त्यांनी स्पष्ट केले. 9 / 9धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली . शरद पवार माध्यमांशी बोलताना या मुद्द्यावर म्हणाले की, रेणू शर्माने धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतली, त्याविषयी फारशी माहिती नाही. मात्र या संबंधात कागदपत्रं जेव्हा आमच्या हातात आली, तेव्हा खोलात जाण्याची गरज आहे, असा आम्ही निष्कर्ष काढला. त्यामुळे तो बरोबर होता असं म्हणायला लागेल, असं शरद पवारांनी सांगितलं. आणखी वाचा Subscribe to Notifications