MLA one, many costumes, in hemant karkare
आमदार एक, वेशभूषा अनेक By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 7:45 PM1 / 10राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये नेहमी आपल्या लूकमुळे अधिवेशन काळात चर्चेत येतात. आमदार एक वेशभूषा अनेक अशीच त्यांची महती बनली आहे. 2 / 10मागील अधिवेशनात शिवाजी महाराजांच्या पोशाखात येऊन बेमूर्वतखोर सत्ताधाऱ्यांना चालते व्हा असा आदेश देत प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्याचे अभिनव आंदोलन केले होते. 3 / 10तसेच दुसरीकडे संभाजी भिडे यांनी आंबा खाल्ल्याने मुलं होतात या विधानाचा निषेध करण्यासाठी संभाजी भिडे यांच्या वेशात विधानभवनात प्रवेश करुन आंब्याची पेटी हातात घेतली होती. 4 / 10संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी त्यांनी चक्क संभाजी भिडेंच्या वेशात विधानभवनात इतर आमदारांना चक्क आंबेही वाटले होते. 5 / 10संत तुकाराम महाराजांच्या अपमान झाल्याचा निषेध नोंदवताना प्रकाश गजभिये यांनी संत तुकाराम यांचा वेश धारण केला होता. 6 / 10मुंबईवर झालेल्या २६/११ हल्यातील शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात अनेक स्तरातून टीका झाली होती.7 / 10हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीने अडकवले, त्यांना मी सांगितले होते की, तुमचा सर्वनाश होईल, त्यांचा स्वत:च्या कर्मानेच मृत्यू झाला, असे धक्कादायक विधान प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते. 8 / 10यावेळी प्रकाश गजभिये यांनी मी प्रज्ञाच्या शापाने मेलो नाही ही अंधश्रद्धा आहे. मी देशासाठी शहीद झालो आहे अशा आशयाचे पोस्टर घेऊन प्रज्ञा ठाकूरच्या वक्तव्याचा निषेध केला. 9 / 10गजभिये यांनी तेथील सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा प्रमुखांनी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेहमीप्रमाणे ते नव्या वेशात विधानभवनात पोहोचलेच.10 / 10प्रकाश गजभिये यांच्या शहीद हेमंत करकरे लूकची मोठी चर्चा विधानभवन परिसरात झाली. गजभिये यांनी अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. आणखी वाचा Subscribe to Notifications