Join us

Raj Thackeray: "...म्हणून राज ठाकरे भविष्यात भाजपासोबत जातील असं वाटत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 4:40 PM

1 / 8
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याने दोन्ही पक्षाची युती होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, राज ठाकरे यांनी आपण चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याच नसल्याचा दावा केला. त्यानंतर, चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार, आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले आहेत.
2 / 8
आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्यात चर्चा होणार असल्याचे समजते. मात्र, युतीचा कुठलाही प्रस्ताव नसून ही मैत्रीपूर्ण भेट होती, असं चंद्रकांत पाटील यांनी भेटीनंतर सांगितलं.
3 / 8
आमच्या भेटीत युतीबाबत चर्चा झाली नाही. मुंबई महापालिकेसाठी भाजपा-मनसे युतीबाबत आज चर्चा झाली नाही. आजची भेट राजकीय नव्हती. प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ यावी लागते. युतीसाठी परप्रांतियांबाबतची भूमिका बदलल्याशिवाय चर्चा नाही. परप्रांतियांबाबतच्या भूमिकेवर राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
4 / 8
चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज ठाकरेंनी निमंत्रण दिल्यानं कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. नाशिकमध्ये झालेल्या भेटीत राज ठाकरे यांनी घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
5 / 8
मी अहंकार मानणारा नेता नाही. कुणी घरी ये म्हटल्यानंतर घरी जाणं ही परंपरा आहे. भेटीच्या आधी चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं की, युती झाली नाही तरी मैत्री राहील, असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
6 / 8
राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाल्यानंतर राज्यातील नेत्यांची यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.
7 / 8
राज ठाकरे यांना 'लाव रे तो व्हिडीओ' प्रयोग आठवत असतील. त्यांनी ज्या पद्धतीने भाजपावर टीका केली आहे, त्यावरून तरी किमान राज ठाकरे भविष्यात भाजपासोबत जातील, असं तुर्तास तरी वाटत नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
8 / 8
दरम्यान, राज ठाकरे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वाधिक टीका भाजपवर केली होती. राज ठाकरे यांचा 'लाव रे तो व्हिडिओ' हा विषय खूप चर्चेचा झाला होता. आता मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी मनसे भाजपा अशी नवीन राजकीय समीकरण सुरू झाले आहेत. त्याचाच भाग म्हणून चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची गाठीभेटी सुरू असल्याचं म्हटलं जात आहे.
टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेस