Join us

#Monsoon2018 गाडीच्या छत्रीपासून ते बॅगच्या कव्हरपर्यंत, पावसाळ्यात विविध वस्तूंनी सजल्या बाजारपेठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 7:23 PM

1 / 9
जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या रंगीबेरंगी छत्र्या, रेनकोट, बॅग, शूज आणि इतर पावसाळ्यासाठी आवश्यक वस्तू गोष्टी पाहून नेमकं काय खरेदी करावं हा प्रश्न तुम्हाला पडून तुमचा गोंधळ उडू शकतो, त्यामुळे तुमची थोडी मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.
2 / 9
1) पावसाळी चपला - आज बाजारात अनेक प्रकारच्या पावसाळी चपला, शूज उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी, स्त्रियांसाठी आणि पुरूषांसाठीच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सॅंडलनी दुकाने, मॉल आणि ऑनलाईन शॉपिंग साईट्स ओसंडून वाहत आहेत.
3 / 9
लहान मुलांना त्यांच्या आवडीच्या कार्टूनची प्रिंट असलेली रेनी शूज आणि रेनी फुटवेअर उपलब्ध आहेत तर स्त्रियांना विविध पॅटर्न आणि रंगांसह भरपूर सँडल उपलब्ध आहेत. त्यातही पेस्टल कलर्सच्या सॅँडलला प्राधान्य दिसतोय.
4 / 9
२) गाडींच्या छत्री - दुचाकी गाडीवर असताना पाऊस आल्यास छत्री उघडण्याचा पर्यायच आपल्याला उपलब्ध नसतो. मग आपण आणि आपल्यासह आपली गाडी भिजते. ती गरज हेरून या नव्या गोष्टीचा शोध लावण्यात आला असावा. आजकाल दुचाकी गाड्यांनासुद्धा छप्पर लावल्याचे तुम्ही आसपास पाहिलं असेल. हे कव्हर असं असतं की, पाऊस पडत असला तरी तुमच्यासहीत तुमची गाडीसुद्धा झाकली जाते आणि न भिजता प्रवास होतो.
5 / 9
३) रेनकोट - छत्र्यांइतकंच रेनकोटला प्राधान्य देणारा एक वेगळा वर्ग अस्तित्वात आहे. काहींना ते दिवसभर सांभाळणं कंटाळवाणं आणि ओझ्यासारखं वाटतं. तर काहींसाठी रेनकोट ‘परफेक्ट’ असतो. लहान मुलांना वेगवेगळ्या कार्टून्सची प्रिंट असलेले किंवा इतर रंगीबेरंगी रेनकोट उपलब्ध आहेत. सरळ वनपीस किंवा टॉप आणि बॉटमचे दोन भाग वेगवेगळे असलेले रेनकोट बाजारात मिळतात.
6 / 9
इतकंच नव्हे तर आता तर काहींच्या मागणीप्रमाणे पाळीव प्राण्यांसाठीसुद्धा रेनकोट बाजारात उपलब्ध होऊ लागले आहेत आणि तसेच आपल्या पाठीवर असणाऱ्या सॅक बॅगसाठीसुद्धा आता कव्हर बाजारात उपलब्ध आहेत.
7 / 9
४) छत्री - पूर्वी बाजारात त्याच त्या जुनाट आणि मळकट रंगांच्या छत्र्या आपल्याला पाहायला मिळायच्या. मात्र हल्ली सगळ्याच क्षेत्रात फॅशन आणि ट्रेंडस ने एंट्री घेतली आहे. त्यामुळे आपल्या रोजच्या वापराला सोईस्कर आणि आपल्या लुक आणि फॅशनला सुटेबल छत्र्या घेण्याचा विचार सर्वांकडून केला जातो.
8 / 9
कॉलेजला जाणाऱ्या मुली लांब दांड्याच्या (जशा पूर्वी आजोबांच्या हातात दिसायच्या तशा) छत्र्यांना पसंती देतात. तसेच तरूणींना फ्रिलवाल्या अर्थात झालर असलेल्या छत्र्या फॅशनेबल वाटतात. तसंच वर्कींग वुमन तीन घड्यांवाली अर्थात थ्री फोल्डवाली छत्री विकत घेतात. कारण तिच्या लहानशा बॅगेत ती सामावली जाते.
9 / 9
इतकंच नव्हे तर हल्ली मोबाईल, लॅपटॉप किंवा आपलं रोजचं सामान भिजू नये, अशा काही बॅग बा़जारात उपलब्ध आहेत. त्यात मोबाईल, बस-ट्रेन पास किंवा आपली बँकांची कार्ड सांभाळून ठेवता येतात.
टॅग्स :MumbaiमुंबईfashionफॅशनMonsoon Specialमानसून स्पेशलmonsoon 2018मान्सून 2018