mukesh ambani security scare nia seizes dvr from sachin vazes society
Sachin Vaze: 'ती' स्कॉर्पिओ चोरीला गेलीच नव्हती! 'दृश्यम' स्टाईल कथा उघडकीस; वाझेंचा पाय आणखी खोलात? By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 10:56 AM1 / 10उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्थितीत आढळून आलेल्या कारचा तपास एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. एनआयएकडून सुरू असलेल्या तपासातून दररोज धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.2 / 10या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) अटक केल्यानं त्यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं. 3 / 10आता एनआयएनं वाझे यांच्याविरोधात पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. वाझे आणि त्यांच्या पोलीस दलातल्या सहकाऱ्यांनी तपासाच्या नावाखाली पुरावे नष्ट केल्याचा संशय एनआयएला आहे.4 / 10मुकेश अंबानींच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्कॉर्पिओबद्दल केला जाणारा दावा एनआयएच्या तपासात खोटा ठरला आहे. 5 / 10व्यवसायिक मनसुख हिरेन यांची कार चोरीला गेली. त्यांनी त्याबद्दल तक्रार नोंदवली आणि त्यानंतर ही कार स्फोटकांनी भरलेल्या स्थितीत अंबानींच्या घराबाहेर आढळून आली, असा घटनाक्रम आतापर्यंत सांगितला गेला. पण एनआयएच्या तपासात मात्र वेगळीच माहिती समोर आली आहे.6 / 10मनसुख हिरेन यांची स्कॉर्पिओ चोरीला गेलीच नव्हती, अशी माहिती एनआयएच्या तपासातून समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं एनआयएच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती मिळाली आहे. 'दैनिक भास्कर'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.7 / 10हिरेन यांच्या मालकीची स्कॉर्पिओ कार १८ ते २४ फेब्रुवारी दरम्यान सचिन वाझेंच्या सोसायटीत अनेकदा दिसून आली. हिरेन यांनी त्यांच्या जबानीत १७ फेब्रुवारीला त्यांची कार मुलुंड-ऐरोली रस्त्यावरून चोरीला गेल्याचं म्हटलं होतं. मात्र या कारमध्ये कोणीही जबरदस्तीनं प्रवेश केल्याचं फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये दिसलेलं नाही. या कारचे दरवाजे चावीनं उघडण्यात आलं होते.8 / 10सचिन वाझेंच्या पथकानं ठाण्यातल्या साकेत सोसायटीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआर ताब्यात घेतल्याची माहिती एनआयएला मिळाली आहे. 9 / 10एनआयएच्या पथकानं हे सर्व डीव्हीआर पुन्हा मिळवले आहेत. सचिन वाझे साकेत सोसायटीत राहतात. मग सचिन वाझे नेतृत्त्व करत असलेल्या सीआययूच्या टीमनं वाझे यांच्याच सोसायटीचे डीव्हीआर का ताब्यात घेतले, त्यांची नोंद पुरावे म्हणून का केली नाही, वाझे आणि टीमकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का, असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत. 10 / 10एनआयएच्या तपासातून समोर आलेल्या माहितीमुळे वाझे यांचे अनेक सहकारी अडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आधी या प्रकरणाचा तपास करणारे पोलीसच नव्या पुराव्यांमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications