Join us

मुंबईत इथं मिळतात सर्व प्रकारची औषधं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2018 1:53 PM

1 / 4
मुंबईतल्या अनेक गल्ल्या तिकडे मिळणाऱ्या वस्तूंमुळे, पदार्थांमुळे प्रसिद्ध आहेत. उदा. खाऊ गल्ली, मसाला गल्ली, चिवडा गल्ली. याच गल्ल्यांप्रमाणे मरीन लाईन्समधील दवाबाजार. देशभरातल्या सगळ्या ब्रॅण्डेड औषधांसाठी हा दवाबाजार प्रसिद्ध आहे.
2 / 4
या दवाबाजारात काय काय मिळतं याची एक सफर करून येऊया. जेणेकरून कधी कोणत्या औषधाची तुम्हाला गरज लागलीच तर इकडे तिकडे भटकण्यापेक्षा थेट दवाबाजारात तुम्ही जाऊ शकता.
3 / 4
मरीन लाईन्स स्थानकावरून सरळ खाली महंमद अली रोडकडे आलात की तिथं लागणारा रस्ता म्हणजे दवाबाजार. सुरुवातीला लागणाऱ्या औषधांच्या दुकानांमध्ये तुम्हाला बेबी क्रीम, बेबी ऑईल, बेबी पावडर, बेबी शॅम्पू, पेट्रोलिअम जेली, अॅसिटोन अशी औषधं मिळतात. या रस्त्यावरच आपल्याला रॉय अॅण्ड कंपनी आणि जॉय फार्मसी यासारख्या होमिओपॅथी ओषधांची जुनी दुकानंदेखील मिळतील
4 / 4
इथं सगळ्या दुकानांची एक संघटनाही आहे. ही संघटना १९२५ साली स्थापन झाली होती. पण त्याही आधीपासून हा दवाबाजार अस्तित्वात असल्याचं म्हटलं जातंय. इथं असणारी औषधांची दुकानं होलसेलची असल्यानं विविध ब्रॅण्डेडची औषधं तुम्हाला मिळतील. सकाळी दहा वाजता ही दुकानं सुरू होतात आणि सायंकाळी बंद होतात.